'टेलिपथी' - एक अलौकीक अतिंद्रिय शक्ति-लेखांक २

 


जेंव्हा भाषा नव्हती, शब्दच नव्हते तेव्हा मनुष्यप्राणी कसे संवाद साधायचा? कसा आपल्या भावना, आपले विचार दुस-यांना सांगायचा? अति प्राचीन काळात मानव इतर प्राण्यां प्रमाणेच आपल्या मनातील विचार दुस-या मानवा पर्यंत पोहोचवत असेल. जसे प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ, सिग्मंड फ्रॉईड यांनी व्यक्त केलेल्या मता प्रमाणे, कीटक व मुंग्या आपल्या सामूहिक इच्छाशक्तीने टेलिपथी द्वारे आपले कार्य करीत असावे. तसेच प्राचीन काळी कदाचित मानव सुद्धा आपल्या समूहात ही टेलिपथी एकमेकांचा विचार जाणून घेण्यासाठी वापरत असेल. चेह-याचे हावभाव, दृष्टिक्षेप हे तेंव्हा उपयोगात येत असतील जेंव्हा व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात असतील पण दूरवरच्या व्यक्तींशी विचारांचे दळणवळण टेलिपथीद्वारे होत असावे.

काळाप्रमाणे मनुष्याची उत्क्रांती होताना मेंदू प्रगत होताना, भाषेचा विकास होताना, मानवाने संप्रेक्षणाच्या नवनवीन पद्धती अवलंबल्या व टेलिपथीची प्रक्रिया, म्हणजे मनाने मनाच्या तारा जोडण्याची’ प्रक्रिया मागे पडली. त्याची जागा टेलिफोनच्या तारांनी घेतली आणि आता तर वायरलेस कम्युनिकेशन- मोबाईलचा वापर होत आहे.  पूर्वी पत्रे लिहिली जायची तेव्हा लिखाणाचा सराव सर्वांना होता. आता ई-मेल, एसएमएस, आणि व्हाट्सअपचा वापर करताना आपण हाताने लिहिणे विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीत किती दूर गेली टेलीपथी आपल्या जीवनातून! याचा र्थ जी अतिंद्रिय शक्ती, अति प्राचीन मनुष्यात सरसकट प्रकर्षाने अस्तित्वात होती, ती आता काही निवडक व्यक्तीं मध्ये नैसर्गिक रित्या अस्तित्वात आहे व काही मोजक्या जणांनाच ती ध्यान धारणेच्या साधनेतून उर्जित करता येते. अर्थात आजच्या भाषेत बोलायचं तर ऍक्टिव्ह’ करता येते पण याचा अर्थ असा नाही, की ही शक्ती सर्वसाधारण व्यक्तींमध्ये नसतेच फक्त तिची जाणीव नसते. दैनंदिन जीवनात कित्येक व्यक्तींना टेलिपथीचे अस्तित्व जाणवते पण ती टेलिपथी’ आहे हे मात्र माहीत नसते. हा अनुभव म्हणजे ‘टेलिपथी’ हे ज्ञान नसते. उदाहरणच पहा ना कित्येक वेळा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो आणि काही वेळात ती व्यक्तीच आपल्या समोर येते. काही वेळेस बोलता-बोलता दोन व्यक्ती एकच विचार प्रकट करतात तेव्हा आपल्या आणि दुस-या व्यक्तीला असे लक्षात येते की आपण एकाच वेळी एकच विचार केला होता. -याचदा आपल्या मनात विचार येतो की फोन वाजला” आणि आपण फोनकडे पाहतो तोवर फोनची रिंग वाजते. जेंव्हा एखादी व्यक्ती, आपल्या जवळची, नात्यातली आपल्या पासून दूर असते. आजारी किंवा संकटात असते तेंव्हा आपल्याला सारखी त्या व्यक्तीची आठवण येते मनाला हुहूर लागते आणि न राहून आपण त्या व्यक्तीला फोन करतो किंवा काही दिवसांनी आपल्याला समजते कि ती व्यक्ती तिच्या आजारपणात किंवा संकटात आपलीआठवण काढीत होती. असेच स्वप्नांच्या बाबतही होते. काही लोकांचे अनुभव आहेत की एका वेळी दोन व्यक्तींना सारखेच स्वप्न पडते किंवा स्वप्नातच कोणी वयस्कर व्यक्ती अथवा आपले गुरु आपल्या मनातील एखाद्या शंकेचे उत्तर देतात व निरसन करतात

हे सर्व अनुभव केवळ योगायोग नाहीत. अभ्यासकांच्या मते जेंव्हा आपले आंतरिक मन जागृत होते, मग ते स्वप्नात असो, एकांतात असो किंवा गर्दीत असो अभावितपणे एखाद्या क्षणासाठी ते आपले लक्ष वेधून घेते. गर्दीत जेंव्हा दुरवर एखादी ओळखीची व्यक्ति दिसते, हाक मारूनही आपला आवाज त्या व्यक्ति पर्यंत पोहोचणे शक्य नसते अशा वेळी आपल्या मनात येते की त्या व्यक्तीने वळून आपल्याकडे पहावे आणि अगदी तसेच होते आपले मन दुस-या व्यक्तिच्या अंतर्मनाशी जोडले जाते. ती व्यक्ती आपल्याकडे पाहते. आजकालच्या भाषेत सांगायचे तर एक जागृत मन दुसऱ्या जागरूक मनाची फ्रिक्वेन्सी त्यावेळेस पकडते, जसे रेडिओची फ्रिक्वेन्सी असते अगदी त्याप्रमाणेच पण अशा घटना अनेकदा अचानक घडतात व त्यामुळे त्यांच्या नोंदी ठेवणे किंवा पुन्हा पुन्हा जसेच्या तसे ते अनुभव सत्यात उतरवणे हे शक्य होत नाही म्हणून शास्त्रीय पद्धतीने या अनुभवांचा अभ्यास करता येणे कठीण होते. अनेक वर्षां पासुन भारतात तसे विदेशातही मानसशास्त्रज्ञ टेलिपथी संबंधी संशोधन करीत आहेत. मुळात या संशोधनाची सुरूवात इथ पासून होती की टेलिपथी ही भौतीक प्रक्रियेतून उत्पन्न होते की मानसिक प्रक्रिया आहे, की त्याही पलीकडे जाऊन परामानसशास्त्रीय घटना आहे.

(क्रमशः)

लेखिका – रेखा छत्रे रहाळकर                                              
  ज्योतिष विशारदभविष्य भूषणहस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ

                       


किमया ग्रह गोचरीची आणि महादशांची

 

विधिलिखित, विधिलिखित म्हणतात ते हेच

जे ब-याचदा बदलता येत नाही आणि जाणकार ज्योतिषी नसेल तर समजतही नाही- काय घडेल, काय घडू शकते, काय बदलता येऊ शकेल, काय प्रयत्न केले म्हणजे यश मिळेल, हे तुम्हाला ज्योतिषीच सांगू शकतो कधी तुमचा हात पाहून, कधी तुमचे ग्रह पाहून, तर कधी तुमच्या जन्म तारखेचे अंक पाहून. या पूर्वीच्या एका लेखात आम्ही अक्षरांची किमया व पंतप्रधानांची नावे दिली होती. जर खरोखरच राजकीय प्रवासासाठी ज्योतिषाकडून मार्गातील अडथळे समजून घेतले तर निश्चितच मुक्कामाचे ठिकाणी पोहोचणे सोपे जाईल, निश्चित होईल. २०२२-२३ या काळात कधीतरी आम्ही भविष्य वर्तवले होते की २८ नोव्हेंबर २०२३ किंवा उशिरात उशिरा १० डिसेंबर २०२३ याचे आत लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपा  पक्ष परत सत्तेत येण्याची शक्यता ७०% आहे तर १० डिसेंबर २०२३ नंतर मे २४ पर्यंत केंव्हाही निवडणूक झाली तरी भाजपा सरकार अर्थात पर्यायने मा. श्री. मोदी सत्तेत येण्याची शक्यता ३०% आहे. ही टक्के वारी देताना आम्ही भारताची रास मकर आणि पंतप्रधानांची रास वृश्चिक याचा जरूर विचार केला होता.

मकर राशीला साडेसाती चालू असून, शेवटचे अडीचके चालू आहे त्यातच २७ ऑक्टोबर २०२३ रोजी काही प्रतिकूल ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करीत होते. व्यक्तिशः मा. श्री. मोदींच्या कुंडलीत लग्न व चंद्र रास एकच असल्याने हे ग्रह प्रतिकूल होत होते. त्या आधारावरच आम्ही वरील भाकीत केले होते.

महाराष्ट्राची रास धनु आहे. २०१४ मध्ये धनु राशीला लागलेली साडेसाती १७ जानेवारी २०२३ रोजी संपल्या नंतर सुद्धा, त्याचे काही परिणाम महाराष्ट्रावर होतच राहीले. पण शनी महाराजांची कृपा की साडेसातीचा शेवट होता, होता महाराष्ट्राला काही चांगले दान पदरात टाकून ही साडेसाती गेली ती कशी ते पाहू.

जरी का शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन राजकीय पक्ष फुटले तरी महाराष्ट्रात परिवर्तन घडले ते या निवडणुकीत आणि ग्रह जे येतात ते परिवर्तनच करायला येतात. मग महादशा असो अंतर्दशा किंवा साडेसाती. वाईटातून चांगले किंवा चांगल्यातून वाईटाकडे परिवर्तन ग्रहांच्या भ्रमणामुळेच होत असते. तेच नेमके परिवर्तन आता मकर राशीत म्हणजेच भारताच्या राशीत, अर्थात केंद्रीय सत्तेत झालेले दिसत आहे. एक पक्षीय सत्ता स्वअधिकारात जे काही चांगल्यात चांगले करते किंवा वाईटात वाईट करते, ते या मकर राशीच्या साडेसातीत भारतीय जनतेने चांगले ही अनुभवले व वाईट ही सोसले. मकर राशीची साडेसाती संपत आली आहे आणि शनी महाराज नक्कीच खूप काही चांगले भारतीय जनतेला देऊन जाणार आहेत. त्याची ही सुरुवात तर नाही?!

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे वेळी त्रिशंकू सरकार येईल असे भाकीत आम्ही केले होते आणि ते शब्दशः सत्यात उतरले हे आपण पाहिलेच आहे. आता, अगदी नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही अंक ज्योतिषाच्या आधारे काही अंदाज व्यक्त केले. महाराष्ट्राच्या बाबतीत ९०% अंदाज खरे ही झाले आहेत. अनेकांनी आम्हाला विचारले होते की मोदी पंतप्रधान होतील का? त्या वेळीही आम्ही हेच उत्तर दिले होते, की मोदी पंतप्रधान होणार नाहीत पण सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष म्हणून भाजप हा पक्ष सत्तेत येऊ शकतो पण इतर पक्षांच्या मदतीनेच आणि तरीही मा. श्री. मोदी स्वत: पंतप्रधान न होता कोणाचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवतील आणि तसे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मा. श्री. मोदींना मंगळाची महादशा सुरू आहे. लग्न व चंद्र कुंडली एकच असल्याने लग्न व चंद्र राशीचा स्वामी मंगळ हा अधिक कठोरपणे त्यांच्याकडे बघणार आहे. आम्ही ज्योतिषी नेहमीच एक उदाहरण देतो की, बाप जसा मुलाचे खूप लाड करतो तसा तो मुलाला फार कडक शिक्षाही करतो. आताही नेमके तेच झाले आहे. एकीकडे बहुमताचा आंकडा पार न करता ही सत्तेची संधी चालून आली आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान पद हिरावून घेतले जाणार आहे- ही सत्वपरीक्षा आहे. बघूयात मा. श्री. मोदी या सत्व परीक्षेत यशस्वी होतात का?

इतर पक्षांचेही ग्रह पाहता नितीश कुमार (जे डी यु) चंद्राबाबू (टी डी पी)  यांच्या जोडीला काल-परवाच स्वतःच्या पक्षातून वेगळी चूल मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथजी शिंदे यांचे ग्रह खूपच प्रभाव टाकत आहेत. शिंदे यांचे उदाहरण घेतले तर ग्रहही कसे छप्पर फाडके देते हैं हे निश्चित पटेल कारण अवघ्या दोन वर्षात मुख्यमंत्रीपद व आता केंद्रात स्वतःचे सात खासदार घेऊन एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत.

...आणि 'इंडी' आघाडी (I.N.D.I. Alliance) बद्दल बोलायचे झालेच तर या घडीला-  लग्न कुंडली, ग्रह गोचर, महादशा या तिन्हीच्या आधारे पंतप्रधान पदाचे तीन उमेद्वार 'इंडी' आघाडी कडे आहेत.

मा. श्री शरद पवार, मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे व मा श्री राहुल गांधी!

या तिघांच्या पत्रिका पुढील प्रमाणे-


 
                                           (मा. श्री शरद पवार)                                         (मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे)


(मा श्री राहुल गांधी)


लेखिका – रेखा छत्रे रहाळकर

ज्योतिष विशारद, भविष्य भूषण, हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


‘टेलिपथी’ - एक अलौकीक अतिंद्रीय शक्ति

 


निसर्गाचे नियम सृष्टीला अनुसरून स्थूल व सूक्ष्म प्रकृतीचे असतात. शास्त्र कोणतेही असो, प्रथम स्थूल सृष्टीच्या नियमांचा उलगडा करीत सूक्ष्म सृष्टीचे नियमांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  तरच विज्ञानाचे परिपूर्ण आकलन होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर त्या शास्त्रा बद्दल संपूर्ण ज्ञान होऊ शकते. जसे उदाहरणार्थ अणुशक्तीच्या शोधा पासून आपण आता नॅनो पार्टिकल पर्यंत येऊन पोहोचलो आहोत पण शास्त्रज्ञांचा हा प्रवास सहज नव्हता २०० वर्षां पूर्वी ही कल्पना हास्यास्पद वाटली असती पण आज हे ज्ञान अवगत झाले आहे. या प्रमाणे अशा अनेक सूक्ष्म सृष्टीच्या संकल्पना मानवाला अवगत करून घ्यायच्या आहेत, शास्त्रज्ञांनी शोध लावणे आवश्यक आहे व या सूक्ष्म सृष्टीच्या निसर्ग नियमांना व्यवहार्य स्वरुपात आणण्यासाठी, त्याचा यथोचित अभ्यास होणे हे ही आवश्यक आहे, नाही तर नुकसान विज्ञानाचे व त्यामुळे मानवाचेच होणार आहे. भौतिक स्वरुपाचे अनेक शोध मानवाने आज पर्यंत लावले. त्यात खूप उंचीही  गाठली. मानसशास्त्रा मध्ये केलेले प्रयोग हे सुडोसायन्स (Pseudoscience) मध्ये गणले जातात. आजच्या समाजाने मानसशास्त्राला सुडोसायन्स (Pseudoscience) म्हणून मान्य केले आहे पण या सुडोसायन्सच्या पलीकडे असलेले परामानसशास्त्र (Parapsychology) ही आहे. या परामानसशास्त्रीय विषयांचा उलगडा सध्या प्रचलित अशा स्थूल शास्त्रीय भाषेत करणे जरा अवघडच आहे.  टेलिपथी हा असाच परामानसशास्त्राशी निगडित विषय आहे. कोणताही परामानसशास्त्रीय विषय समजून घेण्यासाठी बुद्धी व विचारा सहित बाह्य मनाबरोबरच आपले अंतर्मन व आत्मिक जाणीव जागृत असणे, सचेत असणे तसेच तरल व संवेदनक्षम असणे आवश्यक आहे. आपले विचार सकारात्मक व नवीन संकल्पनांचा स्वीकार करायला तयार असायला हवे. यासाठी आपली ग्रहण क्षमता व तर्क क्षमता तसेच मनाची एकाग्रता वाढवणे जरुरी आहे तरच आपण परामानसशास्त्रतील विषयांचे थोडेफार आकलन करू शकतो.

टेलिपथी ही एक अत्यंत महत्त्वाची अतिन्द्रीय शक्ती मानली जाते. ब्रिटनमधील सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च या विख्यात संस्थेचे संस्थापक डॉ. फ्रेडरिक मायर्स यांनी  १८८२ मध्ये प्रथम टेलिपथी हा शब्द वापरात आणला. याला मराठी मध्ये आपण विचार संक्रमण अथवा मानस संदेश किंवा दूर संवेदन अशा नावांनी ओळखतो. जसे टेलिव्हिजन अथवा टेलिफोन या शब्दां मध्ये टेली हा शब्द अंतर दर्शवणारा आहे  तसा  टेलिपथी  मध्ये.  येथे पथीचा अर्थ विचार आहे म्हणून दूर संवेदन इत्यादी शब्दात आपण टेलिपथीचा अर्थ सांगू शकतो. डॉ. फेडरिक मायर्स यांनी केलेली टेलिपथीची व्याख्या बघायची झाली तर ती अशी, ते म्हणतात, आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांच्या मदती शिवाय एका व्यक्तीच्या मनाने दूर अंतरावर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनाशी मनोमन संपर्क साधून केवळ संवेदनांद्वारे केलेल्या विचारांचे दळणवळण म्हणजे टेलिपथी होय.”

टेलिपथी मध्ये दुसर्‍याचे विचार त्याने न सांगता किंवा इतर कोणतेही ज्ञात साधनाविना दुसरी व्यक्ती कितीही दूर असली तरी ते समजून घेता येतात व सांगता येतात अर्थात टेलिपथी मध्ये एका मनाकडून दुसर्‍या मनाशी विचार संप्रेषण अंतर्भूत असते. एक व्यक्ती आपली विचार संवेदने स्पंदन स्वरुपाने दुसर्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित करते व दुसरी व्यक्ती या स्पंदनांचे ग्रहण करते या पद्धतीने संदेश शब्दश:, जसेच्या तसे असतीलच असे नाही पण सारांश स्वरूपात त्यांचा अर्थ समजून घ्यायचा असतो. जसे कोणत्याही माध्यमाविना, शब्द अथवा साधनांच्या शिवाय एका व्यक्तीच्या मनातले विचार दुसर्‍या व्यक्तीच्या मनात येतात किंवा उमगतात त्याप्रमाणे काही वेळेस एका व्यक्तीच्या शारीरिक वेदना सुद्धा दुसर्‍या व्यक्तीला अनुभवास येणे अथवा एका व्यक्तीला येणारे अनुभव, प्रसंग तसेच दुसऱ्या व्यक्तीला स्वतः अनुभवल्या सारखे वाटणे या सर्व गोष्टी टेलिपथी या अर्थाने समजल्या जातात. अर्थात टेलिपथी मधील अनुभवांना अंतरांची मर्यादा नसते पण मानसिक संवेदना सक्षम असणे आवश्यक आहे.

साहजिकच तुमच्या मनात विचार आला असेल की या प्रकारे टेलिपथीचा उपयोग करता आला तर आपले काम किती सोपे होईल. मोबाईल रिचार्ज करण्याचे झंझटच राहणार नाही. पण त्याच वेळी तुम्हाला हेही लक्षात आले असेल की टेलिपथी या अतिंद्रीय शक्तीचा अभ्यास व उपयोग करणे तितके सोपे नाही. समाजातील काही निवडकच व्यक्तींमध्ये नैसर्गिकपणे टेलिपथी अस्तित्वात असल्याचे दिसून येते म्हणजे ती त्यांच्यात उपजतच असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्ती टेलिपथीच्या आधारे दुसर्‍या व्यक्तीचे मनापर्यंत आपले संदेश सहज संप्रेषित करू शकतात. असे संदेश जागृत अवस्थेत अंतर्स्फूर्तीने किंवा झोपेतही स्वप्नांद्वारे अथवा अचानक विचार लहरींच्या माध्यमातून दिले जातात, काही व्यक्ती अनेक वर्षे ध्यान साधना करून आपल्या अंतर्मनातील सुप्त अवस्थेतील टेलिपथीची शक्ती विकसित करतात. यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार, सतत सराव अशा सर्व गोष्टींचा अवलंब मनापासून व निष्ठेने करणे आवश्यक आहे पण तरीही अशी साधना करून त्यात यश मिळवणा-या व्यक्ती अगदी कमी प्रमाणात आढळतात. काही कारणाने टेलिपथीचा सराव जर मध्येच तुटला तर ही शक्ती लोप पावण्याची शक्यता असते. मुद्दामहून केलेल्या टेलिपथीच्या प्रयत्नापेक्षा सुद्धा जर सहज रित्या मनातील विचार दुसर्‍या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचवता आले तर ती टेलिपथी जास्त यशस्वी होते. हेच टेलिपथीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे व कदाचित याच कारणामुळे टेलिपथी या अलौकिक अतेंद्रिय शक्तीचे अस्तित्व पटवून देण्यासाठी प्रयत्न पूर्वक, मुद्दाम केलेले प्रयोग सफल होत नाहीत असे आढळून आले आहे. जितक्या सहजतेने टेलिपथीचा सराव आपले अंतर्मन जागृत करून सहजरीत्या, सकारात्मक दृष्टीने मन एकाग्र करून केले जातील तितक्या चांगल्या रितीने या शक्तीचा अनुभव आपल्याला घेता येईल.  अर्थात हे एक किंवा दोन दिवसाचे काम नाही तर अनेक दिवसांचे, वर्षांचे सरावातून शक्य आहे.

रोजच्या जीवनात आपण पाहतो की टि.व्ही वरील जाहिराती व मालिका आपल्या माध्यमातून तसेच चॅनल वर जोर जोरात ओरडून बातमीदार हे आपला संदेश लोकांच्या मनावर ठासून बिंबविण्याचा प्रयत्न करतात, तसेच निवडणूक काळात नेते मंडळी प्रचारा दरम्यान हातवारे करीत, मोठमोठ्याने बोलून, शब्दांनी भारावून टाकतात. पण हे सर्व बाह्य मनावर झालेले परिणाम असतात, काही संवेदनशील मने या गोष्टींनी प्रभावित होतातही, अगदी मतदानाची वेळ येई पर्यंत हा प्रभाव राहू शकतो. तरी ऐनवेळी अंतर्मनाचे ऐकून ते आपले मत त्याप्रमाणे देऊ शकतात म्हणुन असे म्हणता येते की टेलिपथीचा वरवरचा प्रयोग उपयोगी होत नाही कारण ही शक्ति अंतर्मनापर्यंत पोहोचली तरच प्रभावी ठरते  नाही तर हीचा उथळपणे केलेला उपयोग निरर्थक ठरतो.


लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

ज्योतिष विशारदभविष्य भूषण, हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


श्री हनुमान वडवानल स्तोत्र उपासना

 

(स्त्रोत- गुगल फ्री डाउनलोड ईमेजेस )

वडवानल स्तोत्र उपासना म्हणून म्हणताना- पध्दतकारण, जपाची संख्या, मुदत पुढील प्रमाणे-

*महत्वाचे- वय साठीचे पुढे असेल तर किंवा वेळाच म्हणा पण नियमित म्हणा.  

पध्दत-                                                                                                                     

) उजव्या हातात जी शक्य असेल ती दक्षिणा  रूपये 1/- ते 11/-  फक्त नाणी स्वरूपात घेवून, नेमकी कुठली समस्या आहे त्याचा उच्चार करावा. 

  • समस्या उच्चरणे- उदाहरण-
  •  “मला नोकरी मिळू दे”, “मला सरकारी नोकरी मिळू दे”, “मला अमूक अमूक व्हिसा मिळू दे” ( ज्या देशाचा ज्या काळासाठी व्हिसा मागितला आहे तो उच्चारणे),
  • कोर्टकेस बाबत तसेच प्रतिपक्षाचा उल्लेख करून  “अमूक अमूक केस मी जिंकू देमी  नियमितवेळा स्तोत्र म्हणेनअसा संकल्प करून ताम्हनात हातातील दक्षिणेसह घेतलेले पाणी सोडणे.

) नंतर ही दक्षिणा ब्राह्मणास देणे किंवा मारूतिचे देवळात नेवून ठेवणे.

कारण, जपाची संख्या, मुदत -

() कुठल्याही नोकरीसाठी, रोज सकाळी रोज सायंकाळी एक वेळ म्हणणे किमान सहा महिने.

() सरकारी नोकरीसाठी / / ११ वेळा झेपेल त्यानुसार रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणावे. किमान ६ महिने.

() परदेशगमन, व्हिसा, ग्रीनकार्ड, परमनंट व्हिसा यासाठी पत्रिका दाखवून विचारावे.  -याच वेळा या उपासनेचि गरज भासतेच असे नाही, पण प्रश्न फारच अडकून पडला असेल किंवा काही गंभीर प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर अधिक उपायही सांगता येतात. एरवी 3 किंवा वेळा म्हणावे.

() कोर्टकेस कुठलिही सिव्हिल केस असेल तर , , वेळा म्हणावे रात्री    केस संपेपर्यंत.

*सिव्हील पण घर, वास्तू, वडिलोपार्जित इस्टेट संदर्भात केस असेल तर ,, ११ वेळा.

** केस फौजदारी स्वरूपाचि असेल तर सूर्योदयाचे सुमारास एक वेळ, दुपारी १२ ते या वेळात तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी वेळा असे दिवसातून ११ वेळा म्हणावे यश येईपर्यंत.

याशिवाय नोकरी निमित्त देशात परदेशात दौरे/ टूर करणा -यांनी, कुठल्याही कारणाने सतत प्रवास करावा लागतो त्यांनी, परदेशात रहाणा-या लोकांनी सुरक्षेचे दृष्टीने.  ‘सुरक्षाकवचम्हणून या स्तोत्राची उपासना करावी. हनुमान हा वायुपूत्र आहे, मनाचे वेगाने भक्त रक्षणासाठी तो धांवत येतो. काही वेळेस तरवार्ताही नुरे दु:खाचितद्वत येवू घातलेले संकट आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच परतून लावले जाते.मिरॅकलआहे, पण असे घडते हा लोकांचा अनुभव आहे.  


सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...