‘भविष्यकाळात होणारे आजार, पत्रिकेवरून समजतात का?’

 आरोग्य लेखांक १©


जन्मलग्न कुंडलीत षष्ठ स्थान हेआरोग्याचेतसेचरिपु स्थानम्हणून ओळखले जाते. जीवनात जेंव्हा आजार हा हितशत्रू बनून येतो तेंव्हा तो येण्यापूर्वी, त्याची पाऊले षष्ठ स्थानावरून ओळखू येतात. तसेच व्यय स्थान चतुर्थ स्थान यावरून आजाराचा अंदाज येतो. षष्ठ स्थानातील गोचर ग्रह योगाने, शरीरातील कोणता भाग दुर्बल आहे अथवा भविष्यकाळी दुर्बल होईल हे समजू शकते. अशुभ योग करणारे पापग्रह हे रोगाचा प्रकार दर्शवितात, लग्न बलवान अथवा बलहीन असेल त्याप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती अथवा रोगाला बळी पडण्याची शक्यता लक्षात घेता येते. अष्टम स्थान पाप ग्रहाने पीडित असता, रोगाची तीव्रता किंवा रोग झाल्यास त्याची पीडा हे सर्व जाणून घेता येते. काही वेळेस रोग निदान , त्याची उपाय योजना या बाबतीत वैद्यकशास्त्राची मती कुंठीत होते आणि अशा समयी ज्योतिष शास्त्राचे मार्गदर्शन पुष्कळ योग्य ठरते.

आधुनिक युगात आज एवढी प्रगती झाली जेवढ्या सुखसोयी वाढल्या, तितक्याच प्रमाणात समस्या रोग देखील निर्माण झाले आहेत. कॅन्सर, डायबेटीस, ब्लड प्रेशर उदाहरणे आहेत साहजिकच फल ज्योतिष शास्त्रातील नियम सिद्धान्त अद्यावत करण्याची वेळ आली. अर्थात फलज्योतिषाचे मूलभूत सिद्धान्त आहे तसेच कायम राहतात फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र नवीन ठेवला पाहिजे..

हाय ब्लडप्रेशर या रोगाची स्थाने, जन्मकुंडलीचे प्रथम स्थान म्हणजे तनुस्थान. शरीराच्या प्रकृती संदर्भात , रोग संदर्भात स्थान फार महत्त्वाचे आहे. प्रथमस्थानचा स्वामी सूर्य हा हृदयाचा कारक आहे. तसेच चतुर्थस्थानसुखस्थानआहे. सर्व साधारण शारिरीक सुख यावरून पाहतात. विशेष म्हणजे हृदयाचे कारकत्व चतुर्थ स्थानाकडेच आहे. चतुर्थ स्थानाचा स्वामी चंद्र असून तो मनाचा कारक आहे या स्थानाचा अंमल बुद्धी चिंता मनःस्थिती यावर असून कारक ग्रह गुरु आहे. दशम स्थान हृदयाचे, रोग्याच्या दुःखाचे, कर्माचे कर्मस्थळ आहे. नैसर्गिक कारक ग्रह सूर्य आहे. यासाठी हाय ब्लडप्रेशर संदर्भात तनुस्थान, सुख स्थान दक्षिण म्हणजे कर्म स्थान. हे पाहायला हवे षष्ठ स्थानाचे कारक शनि मंगळ आहेत. त्याचबरोबर आठवे स्थान, मृत्युस्थान. याचा कारक ग्रह शनी आहे. या सर्व स्थानांचा विचार या आजारासाठी करणे क्रमप्राप्त आहे. हृदय रोगाच्या संदर्भात चतुर्थ आणि त्याचा विचार दशम स्थानाचा कधी संबंध असतोच. त्याचा विचार एकत्रित करावा लागतो. पंचम स्थान ही बघावे लागतेम्हणजेच ब्लड प्रेशर वा हृदय रोग यासाठी ही सर्व स्थाने त्यातील ग्रह त्यावर असलेली ग्रहदृष्टि, हे लक्षात घेणे आवश्यक ठरते.

हाय ब्लडप्रेशर साठी सूर्य मंगळ विचार करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर शनी, चंद्र, राहु, केतु या ग्रहांची स्थिती पहावी.

आपण पत्रिकेतील ग्रहांचे शरीरातील अवयवांवर तसेच मानसिक स्थितीवर काय परिणाम होतात ते पाहूया. रवि हा तनुस्थानाचा स्वामी आहे .रवीला आत्मा असेही संबोधले आहे. त्यामुळे हृदय हे रवीच्या अंमलाखाली येते. जसा चंद्र हा मनाचा कारक समजला आहे, चंद्रामुळे भावना ,मानसिक स्थिती पाहिली जाते. मनाचे आरोग्य बिघडल्यास, चंद्र बिघडला आहे का? हे पहावे. बुध स्नायुंसाठी ओळखला जातो. तसेच फुफ्फुसे ,श्वसनक्रिया यावर ही बुधाचा अंमल आहे. ‘भाषाम्हणजेच आपलेउच्चारयावर बुधाचे स्वामीत्व आहे. यामुळे स्वरयंत्र ,घशाचे विकार यासाठी बुधाची स्थिती पाहिली जाते. जर एखादे मूल बोलत नसेल, तर बुध हा ग्रह महत्त्वाचा ठरतो बुधाची उपासना सुचविली जाते किंवा बुधाचे रत्न धारण करण्यास सुचवले जाते. स्वरयंत्रावर तसेच जीभेवर डॉक्टरी उपायांचे जोडीने मंत्रोपच्चार सुचविले जातात. यानंतर आपणास माहित असेल शनि हा हाडांचा कारक आहे. गुडघे दुखी हाडे मोडणे, या जोडीने दीर्घकाळ होणारे आजारही शनी ग्रहावरून पाहिले जातात. लग्न कुंडलीत लग्न राशी तसेच लग्नेश यावरून आजाराचे निदान होऊ शकते. आपले शरीर पंचमहाभूतां पासून बनलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश ही ती पंचमहाभूते. यांची ओळख राशी, त्यांचे स्वभाव. त्यांचे स्वामी राशीचे लग्न कुंडलीतील स्थान यावरूनही आयुष्यात भविष्यकाळात होणारे आजार हे समजू शकतात. जल तत्व, अग्नी तत्व, वायु तत्व, पृथ्वी तत्व, या नुसार राशींचे जे भाग पडले आहेत. तसेच लग्नीं या तत्वाच्या राशीप्रमाणे या राशींच्या स्वामीचा म्हणजेच लग्नेशाच्या स्थानानुसार आजाराचे स्वरूप किंवा आजाराची शक्यता वर्तवता येते. उदाहरणार्थ मेष राशीच्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास होतो. मेष अग्नितत्त्वाची रास असून तिचा स्वामी मंगळ हा तांबूस रंगाचा, क्रोधी, संतापी तीव्र उष्ण समजला जातो. षष्ठस्थानी जर मंगळ असेल किंवा प्रथमस्थानी मेष रास असून तिथे मंगळ असेल तर डोकेदुखी अर्धशिशी असे विकार होऊ शकतात. षष्ठस्थानातील मंगळामुळे उष्णतेचे विकार होऊ शकतात. यानुसार गुरु जर प्रथमस्थानी असेल म्हणजेच लग्न स्थानी असेल किंवा गुरूची रास लग्नात असेल गुरु षष्ठात असेल तर अशी व्यक्ती भोजनशूर असते. -हे -हेचे पदार्थ खाणे या व्यक्तीला आवडते. प्रकृति स्थुल असू शकते. लठ्ठ असू शकते. अशा व्यक्तीस गोडाचे पदार्थ जास्त आवडतात. त्यातून मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात. लठ्ठपणा भोजनाची आवड, गोड खाण्याची संवय या गुरुच्या गुणधर्मामुळे व्यक्तीला मधुमेह होऊ शकतो. हे पत्रिकेवरून समजू शकते योग्य वेळी जातकाला तसे सांगून सतर्क किंवा सावध करता येते.

आरोग्याच्या दृष्टीने पत्रिकेतील स्थानाचा विचार करताना, जन्मकुंडलीतील अथवा राशी कुंडलीतील पंचम स्थान महत्त्वाचे स्थान आहे .अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पंचमस्थानावरून संतती, गर्भ, संततीचे सर्व वर्णन, मुलांची संख्या, मुलांचे सुख दुःखं, मुलांचेकडून सुखदुःख याचा विचार करता येतो.पंचमस्थानाचा विचार करताना, पंचम नवं, सप्तमं ,सप्तमाचे पंचम स्थान जे लाभ स्थान म्हणजेएकादश स्थान आहे, तसेच लग्न स्थान द्वितीय तृतीय स्थानाचा विचार करावा. जन्मकुंडली हा पूर्व संचिताचा आरसा आहे असे म्हणायला हरकत नाही. पूर्वजन्मातील इष्ट- अनिष्ट कर्माचे भोग योग हे ग्रह स्थितीनुसार जाणून घेऊन उपायोजना करणे, हे मानवाच्या हातात असते.

प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी जे ज्योतिष शास्त्रात कर्मकांड दर्शवले आहे, ज्या योगे जप-तप, उपासना, औषधे, वस्त्रे, रत्न, अलंकार, रंगसंगती यांची उपयुक्तता पटवून घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण केल्यास, यश संपादन करता येते. सध्याच्या काळात कुठलाही आजार झाला की आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. -याचदा चुकीचे निदान झाल्याने, चुकीची उपाय योजना होवून वैद्यकीय तज्ञांनाही यश प्राप्त होत नाही. अशा समयी ज्योतिषशास्त्र रोगनिदानाचे बाबतीत अधिक उपयुक्त ठरते. केवळ भौतिक शास्त्रावर अवलंबून रहाता, ज्योतिषशास्त्राच्या कर्मकांडानुसार शास्त्रोक्त विधी उपाय योजना केल्यास रोगनिदान, रोगनिवारण पीडाहरण होवू शकते.     (क्रमशः-)

संदर्भ - ) या संदर्भात अनेकांना केलेले यशस्वी झालेले भविष्य मार्गदर्शन.

           ) अनेक पुस्तके, लेख, पौराणिक ग्रंथ वाचन.

           ) ‘ज्योतिष शास्त्राच्या आधारेअचूक रोग निदानमान्यवर लेखकांचे लेख

लेखिका

     रेखा छत्रे रहाळकर

                                ज्योतिष विशारद, भविष्य भूषण, हस्त सामुद्रिक, चेहरा वाचन तज्ञ


आरोग्य लेखांक २ ©

ज्योतिष आणि जातकशास्त्र ही दोन्ही शास्त्रे परस्परांशी संबंधित आहेत. जातकशास्त्र हे खगोलशास्त्र व ता-यांच्या स्थितीवरून बनलेले शास्त्र आहे. आकाशस्थ ग्रहांची अमुक प्रकारची स्थिती, बदलल्याने अमुक प्रकारचे परिणाम आपल्या देहावर घडतात. असे जे सिद्धांत, प्राचीन व अर्वाचीन ज्योतिषांनी अनेक वर्षाच्या पारिश्रमिक अनुभवांनी स्थापित केले आहेत. ते खरे असल्याचे आढळल्यानेच, जातकशास्त्र बनले आहे. खगोलस्थ तारका-ग्रहादिकांचा पृथ्वी वरील प्राण्यांच्या देहाशी, जो संबंध आहे,  त्याचे मूळ आकर्षणशास्त्रात आहे. जगातल्या प्रत्येक वस्तुत आंतर आणि बाह्य. अशा दोन प्रकारचे. आकर्षण असते. त्या आकर्षण शक्तीचे जोरावरच या विश्वाचा अवाढव्य चक्राचा पसारा व्यवस्थितपणे चाललेला आहे. पृथ्वीवरील प्राणी मात्रांवर तिच्या आकर्षणशक्तीचा जेवढा प्रभाव पडतो, त्यापेक्षा आकाशस्थ ज्योतीचा त्या दूर असल्याने कमी पडणे, सहाजिकच आहे.

जातक शास्त्र व त्या बाबतीत निरनिराळ्या ग्रंथकारांची निरनिराळी मते वाचायला मिळतात. हा विषय विश्वव्यापी आणि मानवी शक्तीच्या आटोक्याबाहेरचा असल्याने याचे पक्केशास्त्र मानवाला बनवणे तितके सोपे नाही. या शास्त्रावर श्रद्धा नसलेले लोक समाजात. दृष्टीस पडतात. शास्त्राचा अधिकाधिक अभ्यास व मूळ सिध्दान्त तसेच ठेवून काळानुरूप आधुनिक उपाय योजना शास्त्रांर्गत शोधणे ही प्रक्रिया सतत ठेवणे गरजेचे आहे.

प्रत्येकाचे पूर्व जन्मार्जित संचित असे काही तरी असतेच. जन्मकालीन ग्रहस्थितीवरून आयुष्यात घडणार-या गोष्टींचे ठोकळ मानाने स्वरूप प्रकट करता येते. म्हणून भावी परिस्थिती रेखाटण्याचे काम हे शास्त्र करते. आजार हा जसा “ नैसर्गिकरीत्या. मानवी देहातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मी आलो आहे” असे सांगतो; तद्वतच वाईट ग्रहस्थिती मानवाला उद्योगी व सत्कृत्यकारी, बनविण्यास उत्पन्न होत असते. तेंव्हा तशा स्थितीत सत्कृत्य करूनच उद्योग तत्पर राहण्यातच फायदा आहे. शत्रु अंगावर चाल करून आला असता; मुकाट्यानेच मान वाकविण्याने ती धडावेगळी होण्याचा संभव असतो. म्हणून शत्रूच्या पुढे मान न वाकवता, त्याचा पराजय करण्याची हिंमत धरून; त्याच्याशी दोन हात करण्याचे धैर्य दाखवा. मान वाचवावयाची असेत तर! याचा संदर्भ काय? तर ग्रहांचा, ग्रहांच्या दशा, महादशा कितीही उग्र असू देत. कितीही तीव्र दुःखाची महादशा, मृदु, सुखावह कशी होईल? हे पहावे. यासाठी या शास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

जातक शास्त्रात जे नऊ ग्रह पूर्वाचार्य मानतात, त्यात राहू केतू हे दोन्ही ग्रह मूळ ग्रह नसून; पृथ्वी व सूर्य यांच्या मध्य रेषेवरून चंद्र जात असताना; जे छेदनबिंदू होतात, ते छेदनबिंदू होत. रवि व चंद्र. यांच्या गती जशा नियमित असतात, तशा इतर ग्रहांच्या नसतात. इतर ग्रहांच्या गती कमी जास्त होत असल्या कारणानेच; त्या त्या गतीवरून ‘कुजस्तंभ’, ‘अस्तंमत’, ‘वक्री’, ‘मार्गी’, ‘अतिचारी’. अशी नावे आहेत. चंद्र, बुध, गुरू व शुक्र. हे शुभ ग्रह आहेत. आणि क्षीणचंद्र. रवी. मंगळ. शनि. राहू. व केतू हे पापग्रह आहेत. बुधाला जशी संगत मिळते, तसा तो बनतो.

शुभग्रहात बुध, गुरु, शुक्र. हे अत्यंत शुभ ग्रह आहेत. रवी हा कालपुरुषाचा ‘आत्मा’ असून. चंद्र ‘मन’ आहे. मंगळ हे ‘सामर्थ्य’. बुध ही ‘वाचा’, गुरु हे सौख्य व ज्ञान याचेसार आहे. तर शुक्र ‘स्त्रिसुख’ आणि शनी हे दुःख आहे. रवी चंद्र गुरु. हे ‘सत्त्वगुणी ‘असून, बुध, शुक्र. हे ‘रजोगुणी’ आहेत. मंगळ आणि शनी. यांचा ‘तमोगुण’ आहे.

मातेच्या उदरात गर्भधारणा झाल्यापासूनच प्रत्येक ग्रहाचा त्यावर परिणाम सुरू होतो. गर्भवाढ होत असतानाच प्रत्येक ग्रह शरीरवाढीसाठी उपयुक्त व कार्यरत असतो.

यामुळेच शारिरीक ठेवण, बांधा, स्नायु, रंग, रूप, अवयव व इंद्रिये यावर कुठल्या ग्रहाचे प्राबल्य आहे, हे जन्मजातच ठरते. जातकशास्त्रात याचा सुक्ष्म विचार केलेला आढळतो. ग्रहांचे मानसिक परिणामही बघणे आवश्यक ठरते व ग्रहानुरूप बघता येते.

शारीरिक ठेवण, मानसिक स्थिती जशी ग्रहांवर अवलंबून आहे, तद्वतच या ग्रहांच्या अंमलाखाली असलेल्या, राशींच्याप्रमाणे शरीरातील अवयव स्नायू, इंद्रिये तसेच मानसिक दृष्ट्‍या, स्वभाव वृत्ती यासर्वाचा शरीरावर होणारा परिणाम हा जातकशास्त्राचा भाग आहे. यावरही आजारपणाची लक्षणें दिसून येतात.

उदाहरणार्थ-

१) शनिचि सत्ता असणा-या मनुष्याची उंची मध्यम, अंगकाठी साधारण, चेहरा मध्यम लांबट, डोळे मोठे व काळे, दांत पसरट, काळे भोर पण विरळ केस, चेहरा उग्र. पायाची बोटे असम प्रमाणाची.

(२) जर गुरु अनुकूल व बलिष्ट असेल, तर तो माणूस मांसल वाटोळ्या गुडघ्यांचा, मध्यम बांध्याचा, पण सुबक व ऐटदार देहयष्टीचा असेल. गौर व गुलाबी वर्णाचा, थोडे जाड व काळे केस. पाणीदार डोळे असलेला असा रंगरुपाने असेल.

या पूर्वीचें भागात आपण षष्ठ स्थानाबद्दल माहिती घेतली होती. षष्ठ स्थान हे आरोग्याचे स्थान असून, यामध्ये विशिष्ट ग्रह, किंवा विशिष्ट राशी काय परिणाम साधतात? हे आपण पाहू शकतो.

मेष राशीः- सहाव्या स्थानी असल्यास, मेंदूचे विकार, मस्तकशूळ. अर्धशिशी. तोंडाचे विकार. नेत्राचे विकार. आणि निद्रानाश. हे आजार होऊ शकतात.

वृषभ राशीः- सहाव्या स्थानी असल्यास श्वासनलिका- दाह विकार, गळ्याचे अनेक आजारहोतात. हृदय विकार, मुत्राशयाचे विकार. व मलोत्सर्ग विकार होतात.

मिथुन राशी:- सहाव्या स्थानी असल्यास, फुफ्फुस विकार, दमा, खोकला, श्वासोश्वास विकार, मज्जातंतू विकार हे आजार होतात.

कर्क राशीः :-सहाव्यास्थानी असल्यास मेद वाढतो. पोटात वायु धरतो. उदर विकार  होतात. नेहमी पचनक्रिया बिघडते.

सिंह राशीः- सहाव्यास्थानी असल्यास कोणत्याही नैसर्गिक वर्तनाचे अतिक्रमण झाल्याने होणारे रोग. अनियमितपणाच्या वागणुकीने जडणारे आजार, रक्त हृदय विकार.

कन्या राशीः- सहाव्यास्थानी असल्यास अपचन, अमांश, बद्धकोष्ठता, पोटाचे रोग होतात.

तूळ राशीः- सहाव्यास्थानी असल्यास मधुमेह. मूत्रपिंडाचे रोग होतात.

वृश्चिक राशीः- सहाव्यास्थानी असल्यास जननेंद्रिय रोग, मूळव्याध. गुप्तरोग. होतात.

धनु राशीः- सहाव्यास्थानी रक्तदोष. क्षय. यकृत विकार मज्जातंतू विकार. होवू शकतात.

मकर राशीः- सहाव्यास्थानी असल्यास रूधिराभिसरण गती योग्य नसल्याने आजार होतात. आमवात. संधिवात. त्वचा रोग. थंडी चे रोग. संभवतात.

कुंभ राशीः- सहाव्यास्थानी असल्यास, रूधिराभिसरण गती योग्य नसल्याने आजार होतात. मानसिक व्यथेचे, अनेक आजार होतात. नेत्र विकार होतात. आंकडीयेणे, हातापायाला पेटके येणे हे आजार उद्भवतात.

मीन राशीः- सहाव्या स्थानी असल्यास खरुज, नायटे, गलिच्छ राहणीचे विकार, आवाळूगांठी. शरीरातील प्रवाहीरस बिघडणे. हे आजार होतात. या ठिकाणी पापग्रह असल्यास क्षय होऊ शकतो.

हे फक्त जन्मलग्न कुंडलीत सहाव्यास्थानी येणा-या राशी व बिघडलेले ग्रह, अथवा पापग्रह यामुळे उद्भवू शकणारे रोग आहेत. तरीही प्रत्येक पत्रिकेचा वेगळा विचार करणे आवश्यक आहे. इतर ग्रहस्थिती, ग्रहांचे बल अथवा बलहीनता,दृ ष्टी ,युतीयोग वगैरे अनेक गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. आपण ग्रहांचे वेगवेगळ्या स्थानातील महत्व ही आरोग्याचे दृष्टिकोनातून पहाणार आहोत.— क्रमशः-(आरोग्य३)

संदर्भ - या संदर्भात अनेकांना केलेले  यशस्वी झालेले भविष्य मार्गदर्शन.

           अनेक पुस्तकेलेख पौराणिक ग्रंथ वाचन.

           ) ‘ज्योतिष शास्त्राच्या आधारे ‘अचूक रोग निदान’ मान्यवर लेखकांचे लेख

लेखिका

     रेखा छत्रे रहाळकर

           ज्योतिष विशारदभविष्य भूषणहस्त सामुद्रिकचेहरा वाचन तज्ञ


 आरोग्य लेखांक ३©

राशिचक्रात एकंदर १२ राशी आहेत. त्यांचे मानवी शरीरावर कसे परिणाम घडतात हे पाहताना, ज्योतिष शास्त्रामध्ये जर विचार केला तर मानवी शरीराचेही मुख्यत्वे १२ भाग होतात. एकेका स्वतंत्र राशीच्या स्वामीचे स्वामित्व एकेका विभागावर असते. आता शरीरामधला जर एखादा भाग एखाद्या राशीच्या ताब्यात असेल तरी त्यांतल्या सर्व इंद्रियांवर त्याच तेवढ्या राशीचा अंमल असतो असें नाही. दुस-याही राशीच्या ताब्यात काही भाग असतात. उदाहरणार्थ- डोक्यावर मेष राशीचा अंमल असतो. पण नाक कान यांच्या आंतररचनेवर वृश्चिक राशी आपली सत्ता चालवते. कर्कराशीचा अंमल छातीवर असतो पण तिच्यातल्या काही भागावर दुस-याच राशीचा अंमल चालतो. ठोबळ मानाने शरीराचे १२ भाग याबाबत माहिती घेऊ. () अवयव आणि बाह्य शरीर () चैतन्य आणि शरीरान्तर्गत रचना ()तीन रज्जू बंध आणि हाडे - असे मानवी शरीराचे तीन मुख्य भाग ज्योतिषशास्त्रात केले आहेत.

अवयव आणि बाह्य रचना -तोंड डोके यावर मेष राशीची सत्ता, मान गळा यावर वृषभ राशीची सत्ता, खांदे हात यांवर मिथुन राशीची सत्ता, पाठ पाठीचा कणा यांवर सिंह राशीची सत्ता, पोटावर कन्या राशीची सत्ता, कमर कातडी यांवर तुळ राशीची सत्ता. जननेंद्रियें गुदद्वार यांवर वृश्चिक राशीची सत्ता, पृष्ठभाग म्हणजे बैठक बरगड्या यांवर धनु राशीची सत्ता. गुडघ्यांवर मकर राशीची सत्ता, पाय बोटे यावर कुंभ राशीची सत्ता. तर पायाचे तळवे पायाची बोटे यावर मीन राशीची सत्ता असते.

चैतन्य आणि आंतररचना -मेंदूवर मेष राशीची सत्ता असते. श्वासनलिका अन्ननलिका यांवर वृषभ राशीची सत्ता असते. फुफ्फुसे, श्वास आणि रक्त यावर मिथुन राशीची सत्ता असते. कोठा पचनेंद्रियें यांवर कर्क राशीची सत्ता असते. हृदयावर सिंहराशीची तर लहान मोठी आंतडी यावर कर्कराशीची सत्ता असते मुत्रपिंडावर तूळ राशीची ,मुत्राशय जननेंद्रिय यावर वृश्चिक राशीची सत्ता असते. शिरा मज्जा यावर धनु राशीचा अंमल असतो ,सांधे हाडे यांचे वर मकर राशीचा अंमल तर रक्त रुधिराभिसरण यावर कुंभ सत्ता तर लसांत्मक द्रव्यावर मीन सत्ता असते .

रज्जूबंध हाडे यावरील राशिसत्ता-- मस्तकाची कवटी तोंडाचि हाडे यांवर मेष सत्ता मानेच्या हाडांवर वृषभ सत्ता खांद्यांची हाडे, गळयाची हाडें, हाताची हाडें यावर मिथुन सत्ता, छातीची हाडें ,फांसळ्या यावर कर्क सत्ता, पाठीचा कण्यावर सिंह कन्या सत्ता, कमरेच्या हाडांवर तूळ राशीची वृश्चिक सत्ता, मांड्यांच्या हाडांवर धनु सत्ता गुडघ्यांची हाडे सांधे यांचे वर मकर सत्ता, घोट्यांवर कुंभ सत्ता, पाऊलांची तळपायाचि हाडें यांवर मीन सत्ता असते.

अग्निराशी, पृथ्वीराशी ,जलराशी तसेच वायुराशी कोणत्या हे पूर्वी झाले आहे .अग्नि राशीची सत्ता डोके, तोंड, हृदय मांड्या यांच्यावर चालते; पृथ्वीराशीची सत्ता गळा, आंतडी, गुडघे कातडी (स्कीन)यांवर चालते. वायुराशीची सत्ता फुफ्फुसे श्वासोश्वास, मूत्राशय वर रक्त यांवर चालते.तर जलराशीची सत्ता पोट, मलोत्सर्ग आणि पाय यांवर चालते.

यानुसार आपल्याला कुठल्या राशीमुळे कुठले आजार होऊ शकतात, याचा अंदाज घेता येतो. मात्र प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवणे क्रम प्राप्त आहे, की शरीरावर इतर ग्रह स्थाना नुसार त्यांचे स्वामीग्रह, कार्य करतो. हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे. फक्त एकाच गोष्टीचा विचार करून आजाराची किंवा रोगांची मीमांसा करू नये. वैद्यक ज्योतिषी ,आणि ज्योतिषी दोघांनी आपापल्या भूमिकेतून रोग्याच्या पत्रिकेचा अभ्यास करावा.

आपण ज्योतिषी म्हणून पत्रिकेचा काय विचार करावा याचा उहापोह या लेखात करणार आहोत. रोग असाध्य आहे की साध्य याचा विचार करताना आजारी व्यक्तिची कुंडली पाहून वैद्यक विचार करतील पण आजार होण्यापूर्वी ज्योतिषाने पत्रिकेचा विचार करून जातकाला आजारपणाची कल्पना कशी द्यावी, त्यासाठी पत्रिकेत काय पहावे? पत्रिकेवरून ज्योतिषी काय सांगू शकतो? याबाबत हा लेख आहे याची नोंद जिज्ञासू वाचकांनी घ्यावी.

हा लेख वैद्यकशास्त्र म्हणून असला तरी वैद्यकासाठी नसून ज्योतिषासाठी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्योतिषाने पत्रिका बघताना पुढील गोष्टी पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही आजारासाठी अष्टमेश, लग्नेश, षष्टेश, चंद्र बघणे गरजेचे आहे.

लग्न, रवी चंद्र या तीन गोष्टी मुख्यत्वे प्रकृतीमान आरोग्य यांचा विचार करताना लक्षात ठेवायला पाहिजे. कारण लग्नावरून शरीरासामर्थ्य, शरीराचा बांधा, रोगोत्पत्ती कोठे होण्याचा संभव असतो, हे समजू शकते. रवी हा पुरुषाच्या कुंडलीत चंद्र हा स्त्रीचे कुंडलीत आयुर्दायक असतो. म्हणूनच त्यांच्याशी होणारे चांगले दृष्टियोग जन्मणा-यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे असतात. मेष, मिथुन, सिंह ,तुला धनु,कुंभ या ज्या पुरुषराशी आहेत, त्या जर लग्नी उदित असतील, तर शरीर मजबूत असून रोगाला हटविण्याचे नैसर्गिक सामर्थ्य जातकात असते. वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर वा मीन या स्त्री राशी आहेत त्या जर लग्नी उदित असतील तर शरीर प्रकृती नाजूक असते, तिचेवर बाह्यकारणांचा म्हणजे हवापाणी, साथीचे आजार वगैरेचा परिणाम फार जलद होतो.

मेष,सिंह धनु या अग्नि तत्त्वाच्या राशी सर्वात सामर्थ्यवान असतात आणि त्याच्या खालोखाल मिथुन तुला कुंभ या वातराशी सामर्थ्यवान असतात. यासहा पुरुष राशी आहेत.

पृथ्वी राशीची माणसे देहाने जरी सुबक सौंदर्यवान असली तरी ताकतींत ती कमी असतात. जलराशीचि माणसें सर्वात दुर्बळ असून रोगांना तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते.

रवी जसा पुरुष राशीत बलवान असतो तसा स्त्रिराशीत नसतो स्त्रिराशीत वृषभ आणि वृश्चिक या काही अंशी बलवान असतात.

अग्नि राशीत रवी असता जन्मणारी व्यक्ती दीर्घायु बळकट शरीराची असते. तरी त्यांना होणारे आजार तीव्र कडक असतात. पण लवकर बरे होतात. वायुराशीत रवी असता जन्मणारी व्यक्ती साधारण मजबूत शरीराची असते देहप्रकृती काळजी ,मानसिक त्रासाने जरी ढासळली हवेच्या बदलाने सुधारते. पृथ्वी राशीत रवी असता जन्मणा-या व्यक्ती काटक मेहनती असतात. अशांचे आजार दीर्घकालीन असतात.

मकर राशीवर जन्मणारी मकर राशीत रवि असता लहानपणा पासून रोगट असतात. वृश्चिक राशीशिवाय कर्क मीन जलराशीत रवी असता जन्मलेली माणसे शरीराने बरीच दुर्बळ असतात त्यांच्यावर बाह्य परिस्थितीचा परिणाम ताबडतोब होतो ताबडतोब होतो. वृश्चिकेत रवी असतां संसर्गिक दोष अधिक होत असतात. (क्रमशःआरोग्य ४

संदर्भ - १) आरोग्य लेख क्रमांक १ व२ यातील संदर्भासह अनेकांना केलेले व यशस्वी झालेले भविष्य मार्गदर्शन.

२) काही आज दुर्मिळ असलेल्या पुस्तकांचे पूर्वी वाचन करताना काढलेली टिपणे(नोट्स), तसेच जुन्या दिवाळी अंकातील लेख .

लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

 ज्योतिष विशारद, भविष्य भूषणहस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


                                     आरोग्य लेखांक ४©

यापूर्वी आपण पाहिले आहे की लग्न,लग्नेश तसेच रवि व चंद्र यावरून मुख्यत्वे करून प्रकृतिमान व आरोग्य पहावे.आज आपण रवि ,चंद्रावर होणारे अशुभ दृष्टियोगाचे परीणाम. तसेच तनुस्थानावरून प्रकृति पहाणार आहोत.

रविवर होणारे अशुभ दृष्टि योग - रविवर चंद्राची अशुभदृष्टी असल्याने थंडीचे विकार होतात व दृष्टीदोष होतो.

रविवर मंगळाची अशुभदृष्टी असल्याने, अंगात उष्णता वाढून ज्वर येतो, ज्वर दाहयुक्त असला तर जखमा वअपघात यांची भीती असते. रवीवर गुरुची अशुभदृष्टी असल्यास रक्तदोष, अपस्मार , रक्ताधिक्य व श्रीमंती रहाणी मानातून उद्भवणारे आजार आणि खाण्यापिण्याच्या अतिरेकाचे किरकोळ आजार होतात .शुक्र रवीचा फक्त एकच काटकोन योग जरी अशुभ असतो, तरी त्यापासून विशेष असे आजार होत नाहीत. काही अपचनाचे किरकोळ आजार होतात. रविवर शनीची जर अशुभदृष्टी असली, तर ती अत्यंत त्रास देते ती फार मुदतीची दुखणे उत्पन्न करते. .थंडीचे व दारिद्र्याचे आजार उत्पन्न करून शरीर अगदी दुर्बल करून टाकते. वेळेला मृत्यूकारक ही ती असते. या दृष्टी इतका कोणत्याही दृष्टीचा अशुभ योग नसतो. रविवरची हर्षल ग्रहाची अशुभदृष्टी असाध्य रोग ,अपघात, मज्जातंतूंच्या क्षुब्धतेचे विकार, मेंदूचे विकार, अग्नीची भीती व मृत्यू उत्पन्न करते.

नेपच्यून हा रवी ताप उत्पन्न करतो.

स्त्रियांच्या कुंडलीत चंद्र – हा जरी आयुर्दायक आहे, तरी वृश्चिक आणि मकर राशीचा असता दुर्बळ असतो. वृश्चिक राशीच्या स्त्रियांना हटकून आर्तवरोग होतो. तो मेदाधिक्य करतो. मकर राशि चंद्राची शक्ती कमी करते. या चंद्रावर जन्मलेल्या स्त्रिया अशक्त व नाजूक असतात त्यांना बालपणातच बरेच आजार होतात.

चंद्रावर होणारा अशुभदृष्टी योग- चंद्रावर रवीचा अशुभदृष्टी योग हा अशक्तता आणून थंडीने प्रकृतीत बिघाड होतो. हा योग स्त्रियांना घातक असतो. चंद्रावरची मंगळाची अशुभ दृष्टी ताप अपघात व दाहक आजार उत्पन्न करते .हा योग स्त्रियांना फार त्रासदायक होतो चंद्रावरची बुद्धाची अशुभदृष्टी ही मानसिक विकार उत्पन्न करते. चंद्रावरच्या ग्रहाच्या अशुभदृष्टीने श्रीमंत राहणीतले अनेक आजार होतात. चंद्रावरच्या रवीच्या अशुभदृष्टीने शैल्याचे दीर्घकाळ टिकणारे व निष्काळजीपणाच्या वर्तनाने रोग होतात.

तनुस्थानावरून शारीरिक स्थिती-

जन्म लग्नी जी राशी उदीत असते, त्यावर जन्मणाराचे आरोग्य व शक्ती ही बऱ्याच अंशी अवलंबिलेली असते. लग्नावर जर कोणत्याही ग्रहांची पापदृष्टी नसेल तर पुढील गुणधर्म तंतोतंत जमतात.

मेष राशी -जर लग्नी उदित असेल तर डोके, पोट ,मूत्रपिंड यांचे आजार होण्याचा संभव असतो. डोळे चांगले नसतात. उष्णतेच्या विकारांचा संभव असतो. मस्तक हलके असते. ज्वर, खरुज वगैरे त्वचारोग

होतात. याला अग्नीपासून भय असते जखमा होण्याचाही संभव असतो

वृषभ रास- जर लग्नात असेल तर शरीर मजबूत असून गळा व ह्दय हे भाग मात्र दुर्बळ असतात. घटसर्प व श्वासनलिकेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे या राशींची वृश्चिक राशी प्रतिक्रिया करते म्हणून मलोत्सर्गाची क्रिया नीट होत नाही व त्यामुळे मुळव्याध,अंगावर फोड येणे ,अपस्मार वगैरे आजार जडतात.

मिथुन राशी - जर लग्नी उदित होत असेल तर होणाऱ्या शारीरिक रोगांना बरे करण्याची शक्ती असणाऱ्या नैसर्गिक शक्तीचा जरी तो देह असतो, तरी मानसिक श्रमाने मज्जातंतू बिघडून अंगी चिडखोरपणा येतो. याने फुफ्फुसाचे विकार होतात व हात आणि खांदे हे विकारी बनतात खोकला दमा व रक्त अशुद्धता ही होण्याचा संभव असतो. या राशीत शनी किंवा मंगळ असतील अथवा शनि व चंद्र असतील व रविवार जर एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल तर क्षयरोग होण्याची भीती असते या राशीतले शनी व मंगळ हे ग्रह सक्रिय दूषित करतात.

कर्क राशी- जर लग्न उदित असेल तर शरीर दुर्बल असते. पण ग्रहण शक्ती फार असल्याने बाह्य परिस्थितीत या लग्नाचे लोक त्वरित बळी पडतात. पोटात नेहमी वात धरणे अन्नपचन न होणे ,संधीवाताने पछाडणे, वगैरे विकार या लग्नाच्या माणसास होतात. या लग्नाच्या माणसांच्या मनोभावना फार नाजूक असतात. त्यांना नेहमी आपल्याला काहीतरी विकृती आहे ,असे वाटत असते. आणि त्यामुळेच त्यांना नेहमी मानसिक दुर्बलतेचे आजार होतात.

सिंह लग्नात -जीवनशक्ती इतर कोणत्याही लग्नापेक्षा अधिक असते. कारण ही राशी अत्यंत बलिष्ठ आहे. या राशीचा अंमल हृदयावर असल्याने हृदयाची क्रिया जलद होणे व मूर्छा येणे वगैरे संभव असतो. पाठीतील कण्याच्या त्वचेवर सूज येणे कमर दुखणे अथवा मोठाली दुखणे येणे हे या राशीचे लक्षण आहे.

कन्या राशीच्या माणसाचा देह ठसकेबाज असून रोग त्वरित बरे होत असतात. या लग्नाच्या माणसाच्या पोटातली आंतडी कमजोर असल्याने त्यांना बद्धकोष्ठ किंवा हगवण अमांश वगैरे पचनक्रिय संबंधाचे निरनिराळे रोग होतात व अग्निमांद्यामुळे क्षीण असतात.

तूळलग्नाची माणसे बांधेसूद असतात. आजार लवकर बरे होतात. त्यांचे मूत्रपिंड व कमर ही कमजोर असतात. त्यामुळे त्यांना मूत्रपिंडाचे आजार ,मधुमेह, व मूत्रावरोध ही दुखणी होतात. त्यांना कंबर दुखी आणि त्वचारोग ही होतात

वृश्चिक लग्नाची माणसे मलोत्सर्गाच्या व जननेंद्रियांच्या बाबतीत नाजूक असतात त्यांना मुळव्याध, शुक्रदोष व उपदंशाचे विकार होतात. प्रतिक्रियाने हृदय व गळा यावर परिणाम होतात. यांचे आकर्षण शक्ती अधिक असल्याने सांसर्गिक रोग जास्त होतात. वृश्चिकेचा शनि अथवा मंगळ असणाऱ्या मनुष्याला मद्याचे व्यसन जडते.

धनु लग्नाच्या- माणसाचा देह लग्न सिंह लग्नी माणसाप्रमाणेच मजबूत असतो. तरीपण या लग्नाच्या माणसांच्या मांड्यांची हाडें दुर्बळ असल्याने, त्यांना आमवात,संधिवात, ज्वर वगैरे दुखणे येतात. व त्यांना जखमा होण्याची आणि हाडे निखळण्याचे विशेष भीती असते.

मकर लग्नाचे लोक दुर्बळ असतात. ते लहानपणी फार अशक्त असतात. त्यांच्या देहात उष्णता कमी असते. त्यांना संधिवात, गुडघे दुखणे यासारखे रोग होऊ शकतात. थंडीचे विकारही त्यांना होतात. त्यांचा देह नेहमी गार असतो. त्यांना ज्वर आला तर तो एकदम नाहीसा होऊन देह गार पडण्याची भीती असते.

कुंभ लग्नाचे जे लोक असतात, त्यांचे देह जरी मजबूत असतात तरी त्यांचे पाय, पोटऱ्या व गुडघे दुर्बळ असतात. त्यांना मज्जातंतूंचे रोग, रक्ताची दुर्बलता, रक्तन्यूनता, पेटके येणे, घोटे दुखणे,पायात किंवा खांद्यात लचक भरणे वगैरे आजार होतात. डोळे बिघडण्याचा पुष्कळ संभव असतो. या लग्नावर जन्मणाऱ्यांचे आजार फार विलक्षण आणि ताबडतोब उद्भवणारे असतात.

मीन लग्नाच्या माणसांची शरीर प्रकृती नाजूक असते. शरीरात जीवनशक्ती बेताचीच असते. त्यांचे रोग बरे होत नाहीत. त्यांना स्पर्शजन्य रोगांची भीती असते .या लग्नाचे लोक कोणत्यातरी व्यसनाच्या आधीन होतात त्यांना मुख्यत्वे मद्याचे व्यसन जडते.

लग्नाचा शुभ दृष्टी योग -

लग्नावर जर गुरु शुक्रांचे शुभ योग होत असतील तर शरीर बरेच निरोगी असते. व त्यांच्या अंगी निसर्गतःच शारीरिक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असते.

लग्नावर रविचंद्राचे जर शुभ योग होत असतील, तर शरीर सुंदर राहून त्याचे कार्य सुरळीत चालण्यास ते योग्य मदत करतात.

लग्नावर मंगळ जर शुभ दृष्टीने बघत असेल तर त्याची दृष्टी शरीरात उष्णता वाढवून मनात इच्छाशक्तीची प्रेरणा करते .

लग्नावर शनीची जर दृष्टी शुभ- असेल तर ती देहातली हाडे मजबूत बनवून शरीर काटक करते.

 संदर्भ - १) आरोग्य लेख क्रमांक १ ते३ यातील संदर्भासह अनेकांना केलेले व यशस्वी झालेले भविष्य मार्गदर्शन.

२) काही आज दुर्मिळ असलेल्या पुस्तकांचे पूर्वी वाचन करताना काढलेली टिपणे(नोट्स), तसेच जुन्या दिवाळी अंकातील लेख .

                        लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

            ज्योतिष विशारद, भविष्य भूषण,हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ

No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...