किमया ग्रह गोचरीची आणि महादशांची

 

विधिलिखित, विधिलिखित म्हणतात ते हेच

जे ब-याचदा बदलता येत नाही आणि जाणकार ज्योतिषी नसेल तर समजतही नाही- काय घडेल, काय घडू शकते, काय बदलता येऊ शकेल, काय प्रयत्न केले म्हणजे यश मिळेल, हे तुम्हाला ज्योतिषीच सांगू शकतो कधी तुमचा हात पाहून, कधी तुमचे ग्रह पाहून, तर कधी तुमच्या जन्म तारखेचे अंक पाहून. या पूर्वीच्या एका लेखात आम्ही अक्षरांची किमया व पंतप्रधानांची नावे दिली होती. जर खरोखरच राजकीय प्रवासासाठी ज्योतिषाकडून मार्गातील अडथळे समजून घेतले तर निश्चितच मुक्कामाचे ठिकाणी पोहोचणे सोपे जाईल, निश्चित होईल. २०२२-२३ या काळात कधीतरी आम्ही भविष्य वर्तवले होते की २८ नोव्हेंबर २०२३ किंवा उशिरात उशिरा १० डिसेंबर २०२३ याचे आत लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपा  पक्ष परत सत्तेत येण्याची शक्यता ७०% आहे तर १० डिसेंबर २०२३ नंतर मे २४ पर्यंत केंव्हाही निवडणूक झाली तरी भाजपा सरकार अर्थात पर्यायने मा. श्री. मोदी सत्तेत येण्याची शक्यता ३०% आहे. ही टक्के वारी देताना आम्ही भारताची रास मकर आणि पंतप्रधानांची रास वृश्चिक याचा जरूर विचार केला होता.

मकर राशीला साडेसाती चालू असून, शेवटचे अडीचके चालू आहे त्यातच २७ ऑक्टोबर २०२३ रोजी काही प्रतिकूल ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करीत होते. व्यक्तिशः मा. श्री. मोदींच्या कुंडलीत लग्न व चंद्र रास एकच असल्याने हे ग्रह प्रतिकूल होत होते. त्या आधारावरच आम्ही वरील भाकीत केले होते.

महाराष्ट्राची रास धनु आहे. २०१४ मध्ये धनु राशीला लागलेली साडेसाती १७ जानेवारी २०२३ रोजी संपल्या नंतर सुद्धा, त्याचे काही परिणाम महाराष्ट्रावर होतच राहीले. पण शनी महाराजांची कृपा की साडेसातीचा शेवट होता, होता महाराष्ट्राला काही चांगले दान पदरात टाकून ही साडेसाती गेली ती कशी ते पाहू.

जरी का शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन राजकीय पक्ष फुटले तरी महाराष्ट्रात परिवर्तन घडले ते या निवडणुकीत आणि ग्रह जे येतात ते परिवर्तनच करायला येतात. मग महादशा असो अंतर्दशा किंवा साडेसाती. वाईटातून चांगले किंवा चांगल्यातून वाईटाकडे परिवर्तन ग्रहांच्या भ्रमणामुळेच होत असते. तेच नेमके परिवर्तन आता मकर राशीत म्हणजेच भारताच्या राशीत, अर्थात केंद्रीय सत्तेत झालेले दिसत आहे. एक पक्षीय सत्ता स्वअधिकारात जे काही चांगल्यात चांगले करते किंवा वाईटात वाईट करते, ते या मकर राशीच्या साडेसातीत भारतीय जनतेने चांगले ही अनुभवले व वाईट ही सोसले. मकर राशीची साडेसाती संपत आली आहे आणि शनी महाराज नक्कीच खूप काही चांगले भारतीय जनतेला देऊन जाणार आहेत. त्याची ही सुरुवात तर नाही?!

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे वेळी त्रिशंकू सरकार येईल असे भाकीत आम्ही केले होते आणि ते शब्दशः सत्यात उतरले हे आपण पाहिलेच आहे. आता, अगदी नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही अंक ज्योतिषाच्या आधारे काही अंदाज व्यक्त केले. महाराष्ट्राच्या बाबतीत ९०% अंदाज खरे ही झाले आहेत. अनेकांनी आम्हाला विचारले होते की मोदी पंतप्रधान होतील का? त्या वेळीही आम्ही हेच उत्तर दिले होते, की मोदी पंतप्रधान होणार नाहीत पण सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष म्हणून भाजप हा पक्ष सत्तेत येऊ शकतो पण इतर पक्षांच्या मदतीनेच आणि तरीही मा. श्री. मोदी स्वत: पंतप्रधान न होता कोणाचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवतील आणि तसे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मा. श्री. मोदींना मंगळाची महादशा सुरू आहे. लग्न व चंद्र कुंडली एकच असल्याने लग्न व चंद्र राशीचा स्वामी मंगळ हा अधिक कठोरपणे त्यांच्याकडे बघणार आहे. आम्ही ज्योतिषी नेहमीच एक उदाहरण देतो की, बाप जसा मुलाचे खूप लाड करतो तसा तो मुलाला फार कडक शिक्षाही करतो. आताही नेमके तेच झाले आहे. एकीकडे बहुमताचा आंकडा पार न करता ही सत्तेची संधी चालून आली आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान पद हिरावून घेतले जाणार आहे- ही सत्वपरीक्षा आहे. बघूयात मा. श्री. मोदी या सत्व परीक्षेत यशस्वी होतात का?

इतर पक्षांचेही ग्रह पाहता नितीश कुमार (जे डी यु) चंद्राबाबू (टी डी पी)  यांच्या जोडीला काल-परवाच स्वतःच्या पक्षातून वेगळी चूल मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथजी शिंदे यांचे ग्रह खूपच प्रभाव टाकत आहेत. शिंदे यांचे उदाहरण घेतले तर ग्रहही कसे छप्पर फाडके देते हैं हे निश्चित पटेल कारण अवघ्या दोन वर्षात मुख्यमंत्रीपद व आता केंद्रात स्वतःचे सात खासदार घेऊन एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत.

...आणि 'इंडी' आघाडी (I.N.D.I. Alliance) बद्दल बोलायचे झालेच तर या घडीला-  लग्न कुंडली, ग्रह गोचर, महादशा या तिन्हीच्या आधारे पंतप्रधान पदाचे तीन उमेद्वार 'इंडी' आघाडी कडे आहेत.

मा. श्री शरद पवार, मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे व मा श्री राहुल गांधी!

या तिघांच्या पत्रिका पुढील प्रमाणे-


 
                                           (मा. श्री शरद पवार)                                         (मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे)


(मा श्री राहुल गांधी)


लेखिका – रेखा छत्रे रहाळकर

ज्योतिष विशारद, भविष्य भूषण, हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


1 comment:

  1. खूप खूप खूप अभ्यासातून आलेला लेख, अगदी पारखी नजर दिसतेय, फक्त एक प्रश्न आहे की भारताचे भवितव्य सर्ववरणारे पंतप्रधान असावे, भारत मातेला आता कुठली ही कळ सोसावी न लागे

    ReplyDelete

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...