नवरात्र - नव शक्तीचा उत्सव



देवी सिद्धिदात्री

अलौकिक शक्तींची देवी


शक्तीचे नववे रूप, देवी सिद्धिदात्री ही अलौकिक शक्ती म्हणजेच सिद्धींचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. आपण आपल्या नैसर्गिक स्वभावावर, आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीवर, प्रलोभनांवर, कमकुवतपणावर आणि मानव म्हणून अतिरेकी इच्छा अथवा वासनांवर विजय मिळवल्यानंतरच सिद्धी प्राप्त होऊ शकतात आणि म्हणूनच एखाद्याला साधक असणे आवश्यक आहे म्हणजेच एक साधू जो जन्मजात स्वभावावर मात करण्यासाठी आणि आपल्या नैसर्गिक स्वभावाच्या पलीकडे जाण्यासाठी साधना करतो तसे बनण्याची आवश्यक्ता आहे.. नवरात्रीच्या नऊ दिवस आणि रात्री, भक्त शक्तीची तिच्या विविध रूपांमध्ये पूजा करतात, ज्यामुळे तम, रज आणि सत्वगुणांवर विजय मिळतो व अशा प्रकारे उपवास, उपासना आणि भक्तीद्वारे देवी सिद्धिदात्रीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी स्वतःला तयार करतात.


असे मानले जाते की विश्वाची निर्मिती करणाऱ्या देवी महाशक्तीने त्रिमूर्ती - ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांना जन्म दिला. तिने त्यांना विश्वातील त्यांच्या भूमिकेवर ध्यान आणि चिंतन करण्याचा सल्ला दिला. तिघांनी हजारो वर्षांपासून कठोर तपस्या केली. त्यांच्या दृढनिश्चयाने आणि तिच्यावरील भक्तीने प्रसन्न होऊन, देवी महाशक्तीने देवी सिद्धिदात्रीचे रूप धारण केले आणि प्रत्येकाला शक्तीचा आशीर्वाद दिला, (त्यांच्या पत्नी किंवा अर्धांगिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या) तिने ब्रह्माला सरस्वती, विष्णूला लक्ष्मी आणि शिवाला पार्वती दिली. तिने त्यांना ज्या भूमिका करायच्या होत्या त्या देखील दिल्या - ब्रह्माला तिने सृष्टीची जबाबदारी दिली, विष्णूला तिने विश्वाचे रक्षण किंवा संरक्षण करण्याची जबाबदारी दिली आणि शिवाला तिने कालांतराने अनावश्यक गोष्टी नष्ट करण्याची भूमिका दिली. तिने त्यांना सांगितले की अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वतीच्या रूपात असलेल्या त्यांच्या शक्ती त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करतील. या शक्तींव्यतिरिक्त, देवी सिद्धिदात्रीने त्यांना आठ सिद्धी दिल्या - त्या आहेत - अनिमा - त्यांचा आकार सर्वात लहान बिंदूपर्यंत कमी करण्याची क्षमता, महिमा - त्यांचा आकार सर्वात मोठ्या, अनंत आकारापर्यंत वाढवण्याची क्षमता, गरिमा म्हणजे जड होण्याची क्षमता आणि लघिमा म्हणजे शक्य तितके हलके वजन कमी करणे. प्राप्ती - एखाद्याला जे हवे आहे ते मिळवण्याची किंवा साध्य करण्याची क्षमता, प्रकाम्य - मध्ये अनेक क्षमतांचा समावेश आहे आणि म्हणूनच विश्वातील कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्याची क्षमता आहे, उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पाण्याखाली राहू शकते, उडू शकते, टेलिपोर्ट (एका ठिकाणी शारिरीक दृष्ट्या असताना, दुस-या ठिकाणी पोहोचणे/प्रकट होणे)) करू शकते, वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते, कोणत्याही लांबीपर्यंत आयुष्य वाढवू शकते, इत्यादी. इश्विता - निसर्गावर नियंत्रण ठेवण्यासारख्या भौतिक गोष्टींवर पूर्ण शक्ती आणि नियंत्रण ठेवण्याची क्षमता - पाऊस पाडणे, इच्छेनुसार अग्नी निर्माण करणे. वशित्व - ही सिद्धी कोणालाही, सर्व सजीव प्राणी मग ते मानव असो वा प्राणी, त्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यास सक्षम करते. देवी सिद्धिदात्रीने तीन देव, नऊ खजिना आणि दहा अलौकिक शक्ती प्रदान केल्या. या सर्व वरदानांपासून देवांनी संपूर्ण विश्व, तारे आणि ग्रह आणि सर्व प्रकारचे जीवन निर्माण केले.  म्हणून सिद्धिदात्रीच्या रूपात, देवीला पार्वतीचे मूळ रूप म्हणून चित्रित केले आहे.


देवी सिद्धिदात्रीला तिने तिच्या संततीला दिलेल्या सर्व सिद्धी आणि शक्ती, तीन देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश धारण केलेले चित्रण केले आहे. ती कमळावर विराजमान आहे, तिच्या चारही हातात कमळ, गदा, शंख आणि चक्र आहे. तिच्या भोवती यक्ष, गंधर्व, सिद्ध, देव आहेत. असुर देखील तिची पूजा करतात.


देवी सिद्धिदात्रीची पूजा ज्ञान देते, ती आपल्याला या वस्तुस्थितीकडे घेऊन जाते की ती सर्वोच्च दिव्य शक्ती आहे, एकमेव आहे. ती सर्व सिद्धींचे नेतृत्व करते.


देवी सिद्धिदात्रीचा आवडता रंग मोराचा- मोरपिशी, हिरवा आहे. तो अज्ञानाचा अंत आणि दैवी ज्ञान प्राप्त करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे, तिचे आवडते फूल प्लुमेरिया म्हणजेच चंपा हे आहे.


देवी सिद्धिदात्रीची पूजा कशी करावी


देवी सिद्धिदात्री ही आश्विन शुक्ल नवमीला पूजा केली जाणारी देवी आहे. या वर्षी  १ ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. 


पूजा सुरू करण्यापूर्वी, तुमचे मन आणि शरीर शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या मनात स्वच्छ, सकारात्मक विचार ठेवा, कोणत्याही जबरदस्तीने दुष्ट इच्छा बाळगू नका किंवा पूजा करू नका. तुमचे मन आणि शरीर चांगले विश्रांती घेऊन शांत असले पाहिजे.


जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करत असाल तर तुम्ही ती करू शकता किंवा तुमच्या भक्तीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश  त्यावर नारळ ठेवून पुजा  स्थानी ठेवू शकता


देवी सिद्धिदात्रीची मूर्ती किंवा चित्र वेदीवर मोरपिशी,  हिरवा, हिरवा, निळा किंवा जांभळा रंगाच्या आसनावर ठेवा.


तुम्ही  स्वतः  मोरपिशी, हिरवा, निळा किंवा जांभळा रंग घालू शकता.


चंपा फुले किंवा पिवळी फुले, विशेषतः पिवळा गुलाब अर्पण करा.


प्रसादात किंवा नैवेद्यात - देवी सिद्धिदात्रीला दूध, खीर, पंचामृत, केळी अर्पण करा


दुर्गा सप्तशती मंत्राचा किंवा पर्यायाने श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करा आणि देवी सिद्धिदात्रीच्या मंत्राचा जप करा.


|| ॐ ऐं ह्रिं क्लिं सिध्दिदात्र्यै नमः || 

(Om Aim hreem kleem Siddhidatryei Namah)


देवी सिद्धिदात्रीसमोर तुपाचे दिवे आणि उद्बत्ती लावा आणि तिला समर्पित मंत्रांचा जप करा.


सिद्धिदात्री देवीची उपासना केल्याने ज्ञान, सिद्धी, शांती, समृद्धी मिळते आणि तिच्या भक्तांच्या जीवनात सुसंवाद निर्माण होतो.


देवी सिद्धिदात्री तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान आणि समजूतदारपणा देवो, तिच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होवोत.


                                                              🙏🙏🙏


                                                             ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...