आदिक्ती
गेले दहा दिवस आपण चैतन्याच्या वादळात गुंतलो होतो. आपण आपल्या जीवनात दैवी उर्जेचे अस्तित्व आणि भूमिकेचा जल्लोष साजरा केला. उपवास आणि मेजवानी, रंगीबेरंगी विधी आणि कपडे, फुले, फळे यांचा सुगंध, व त्यामुळे सुगंधित झालेले वातावरण, नैवेद्य म्हणून तयार केलेली मिठाई, धूप, अत्तर आणि संगीत होते, मंत्रांचा ताल होता. हो, वातावरण उर्जेने भरलेले व भारलेले होते. सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाली आणि लोक उशिरा पर्यंत जागले.
माता शक्तीचा उत्सव साजरा करणारा नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस आश्विन शुक्ल दशमी, विजया दशमी किंवा दसरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या दिवशी संपतो, जो वाईटावर चांगल्याचा विजय आणि त्रिगुणांचे संतुलन दर्शवितो.
आशा आहे की, नवरात्र आणि दसरा साजरा करणारे सर्वजण प्रेम, दया, आपुलकी आणि शांतीने सकारात्मकता स्वीकारून आणि नकारात्मकते पासून मुक्त होऊन हा सण साजरा करतील आणि दसऱ्या नंतरही ज्ञानाचा आदर करीत, अंगीकार करतील- जे जे अंधकार मय आहे, नकारात्मक आहे, दुष्ट प्रवृत्तींनी भरलेले आहे त्यावर विजय मिळवतील व आनंदात राहतील.
नवरात्र संपल्यानंतर आणि दशमी गेल्यानंतर शक्तींचे काय होईल? आपण शिकणे, प्रेम करणे, जाणून घेणे आणि वाढ व विकास करणे थांबवतो का? आपण तीन गुणांपैकी एका गुणाच्या टोकाला बळी पडतो का? आणि इतर दोन गुणांकडे दुर्लक्ष करतो का? म्हणजे - आपला तामसी गुण आता आपल्या रज गुणांवर किंवा सात्विक गुणांवर मात करेल का? नाही ना...
नवरात्री संपल्यानंतरही आपण तीन गुणांचे संतुलन कसे चालू ठेवू शकतो?
आपण आपल्या या जग निर्मात्याशी आपल्या विधात्याशी जवळून जोडलेले आहोत. महाशक्ती, विश्वाची निर्मिती करणारी दैवी ऊर्जा, म्हणजेच ब्रह्मांड, निर्जीव किंवा सजीव सर्व गोष्टी त्याच पाच नैसर्गिक घटकांपासून निर्माण केल्या - आप, तेज, वायु , पृथ्वी, आकाश ज्या पासून आपण निर्माण झाले आहोत.
विश्वात जे जे अस्तित्वात आहे ते ते आपल्या आत आहे. म्हणतातच ना ‘जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी’. या विश्वाचे कार्य करणारी ऊर्जा आपल्याला जगण्यास आणि अनेक गोष्टी साध्य करण्यास सक्षम बनवते.
ज्योतिषशास्त्र हे सिद्धांत, संहिता आणि होरा या तीन खंडांद्वारे, पृथ्वीवरील जीवनावर आणि विशेषतः मानवी जीवनावर ऊर्जा कशी परिणाम करते याचे हेच स्वरूप शोधते. असे मानले जाते की नवदुर्गा सूर्यमालेतील ग्रहांशी संबंधित आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या उर्जेमुळे सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतो, विश्वातील एका विशिष्ट पातळीवर चैतन्यशीलता असते, या स्पंदनांचे संतुलन आपल्याला कोणत्याही एका प्रकारच्या उर्जेच्या अतिरेकी वापराच्या नकारात्मक परिणामांवर मात करण्यास मदत करेल.
येथे पुन्हा एकदा, नवदुर्गाची नावे दिली आहेत परंतु त्यासोबत हे मंत्र ज्या ग्रहांना नियंत्रित करतात ते व ग्रहांची त्यांची नावे देखील नमूद केली आहेत.
तुम्ही तुमच्या ज्योतिष्याला, तुमची जन्मकुंडली दाखवून सल्ला घेऊ शकता आणि तुम्हाला कोणती ऊर्जा संतुलित करायची आहे, किंवा कोणती ऊर्जा कमी आहे आणि या ऊर्जा संतुलित करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी योग्य प्रक्रिया कशी आहे हे समजून घेण्यासाठी त्यांचा विचार घेऊ शकता. तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय यापैकी कोणताही मंत्र वापरण्याचा प्रयत्न करू नका असा तुम्हाला सल्लाआहे.
देवीचे नाव मंत्र ग्रह
देवी शैलपुत्री ॐ देवी शैलपुत्र्यै नमः चंद्र
देवी ब्रह्मचारिणी ॐ देवी ब्रह्मचारिणी नम: मंगल
देवी चंद्रघंटा ॐ देवी चंद्रघण्टायै नम: शुक्र
देवी कुष्मांडा ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नम: सूर्य
देवी स्कंदमाता ॐ देवी स्कन्दमातायै नम: बुध
देवी कात्यायनी ॐ देवी कात्यायन्यै नम: गुरू
देवी कालरात्री ॐ देवी कालरात्र्यै नम: शनि
देवी महागौरी ॐ देवी महागौर्यै नम: राहू
देवी सिद्धिधात्री ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्यै नम: केतू
देवी आदिशक्ती तिच्या भक्तांना आत्मज्ञान आणि आनंदी जीवन प्रदान करो!
🙏🙏🙏
ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर
No comments:
Post a Comment