पवित्रता व मनः शांतीची देवी शक्तीची देवी
शेवटचे तीन दिवस त्रिमूर्ती, तीन सर्वोच्च देवी- देवी सरस्वती, देवी दुर्गा आणि देवी महालक्ष्मी या शक्तीच्या रूपांना समर्पित आहेत, म्हणून नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरी माता तसेच देवी दुर्गेला वाईटावर विजय मिळवल्या बद्दल समर्पित आहे.
महागौरी ही ती देवी किंवा शक्ती आहे जी पार्वती, दुर्गा, काली आणि इतर अनेक रूपांमध्ये प्रकट होते. ती शुभ आहे, चांगल्या लोकांना वाईटापासून वाचवते आणि वाईट कृत्ये किंवा विचारांमध्ये गुंतलेल्यांना शिक्षा करते. जर भक्तांनी तिची मनापासून पूजा केली तर तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तिच्यात आहे. तिचे नाव, महागौरी, हे तिच्या गोऱ्या, सोनेरी रंगाचे प्रतीक आहे जे तिने गंगा नदीत स्नान करून प्राप्त केले होते, परंतु चंड-मुंड राक्षसांचा नाश करण्यासाठी तिला अतिशय काळ्या कालीचे रूप धारण करावे लागले.
देवी महागौरी पांढऱ्या बैलावर स्वार आहे. तिचे चार हात आहेत आणि तिच्याकडे त्रिशूल आणि डमरू आहे. देव-देवतांच्या हातात असलेले डमरू आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारे ध्वनी (नाद, एक लय) निर्माण करते असे मानले जाते, ते ध्यानासाठी देखील वापरले जाते. देवी महागौरीचे इतर दोन्ही हात आशीर्वाद आणि संरक्षणात्मक आहेत. तिची पूजा केल्यावर तिचे भक्त त्यांच्या सर्व दुःखांपासून मुक्त होतील. देवी महागौरीला इतर ही नावांनी ओळखले जाते जसे की ‘श्वेतांबरधरा’ कारण ती पांढरी वस्त्रे परिधान करते, ‘वृषरुढा’’ - कारण ती वृषावर बसलेली असते आणि ‘शांभवी’ - कारण ती तिच्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते.
देवी महागौरीचा आवडता रंग जांभळा आहे आणि तिचे आवडते फूल जाई व मोगरा आहे. भक्त या शांती, पवित्रता आणि क्षमा दर्शविणा-या देवी महागौरीला नारळ अर्पण करतात.
देवी महागौरीची पूजा कशी करावी
पूजा सुरू करण्यापूर्वी, तुमचे मन आणि शरीर शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या मनात स्वच्छ, सकारात्मक विचार ठेवा, कोणत्याही जबरदस्तीने दुष्ट इच्छा बाळगू नका किंवा पूजा करू नका. तुमचे मन आणि शरीर चांगले विश्रांती घेऊन शांत असले पाहिजे.
जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करत असाल तर तुम्ही ती करू शकता किंवा तुमच्या भक्तीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश त्यावर नारळ ठेवून पुजा स्थानी ठेवू शकता
वेदीवर देवी महागौरीची मूर्ती किंवा चित्र एका चमकदार जांभळ्या, पांढऱ्या किंवा गुलाबी कापडावर ठेवा. तुम्ही एकाच वेळी दुर्गेच्या सर्व नऊ रूपांची पूजा देखील करू शकता.
तुम्ही स्वतः जांभळ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालू शकता. पांढरा रंग परिधान केला जातो कारण तो देवीच्या पवित्रतेचे प्रतीक आहे.
जाईची किंवा मोग-याची फुले, रात्री फुलणारी जाई रात राणी देवीला अर्पण करा
प्रसाद किंवा नैवेद्यात - नारळ आणि दुधापासून बनवलेल्या मिठाई, नारळाची बर्फी आणि काळे चणे अर्पण करा
दुर्गा सप्तशती मंत्र किंवा पर्यायी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करा आणि देवी महागौरीसाठी मंत्राचा जप करा
|| ॐ देवी महागौर्यै नमः || (Om Devi Maha Gauryai Namah)
दुर्गापूजनासाठी तुम्ही मंत्र पठण करू शकता
या देवी सर्वभुतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता
या देवी सर्वभुतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
Ya devi sarva bhuteshu, shanti rupena sangsthita
Ya devi sarva bhuteshu, shakti rupena sangsthita
Ya devi sarva bhuteshu, matri rupena sangsthita
Yaa devi sarva bhuteshu, buddhi rupena sangsthita
Namastasyai, namastasyai, namastasyai, namo namaha
कन्या पूजनाचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
Ya Devi Sarvabhooteshu ‘Kanya’ Roopeni Sansthita
Namastasyeyai Namastasyeyai Namastasyeyai Namo Namah
महागौरीसमोर तुपाचे दिवे आणि उद्बत्ती लावा आणि तिला समर्पित मंत्रांचा जप करा.
महाअष्टमीच्या या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे कन्या पूजन कारण महागौरी ही देवी पार्वतीचे कन्या रूप आहे, या दिवशी २ ते १० वयोगटातील मुलींना विशेष महत्त्व दिले जाते. ही एक सुंदर परंपरा आहे जिथे लहान मुलींची पूजा केली जाते!
कन्या पूजन किंवा कंजक पूजन - लहान मुलींना देवी महागौरी किंवा देवी दुर्गा मानून तुमच्या घरी आमंत्रित करा, त्यांचे पाय धुवा, त्यांच्या कपाळावर कुंकू, अक्षता लावा. त्यांना हलवा, पुरी आणि काळे चणे खायला द्या. कपडे, दागिने किंवा पैसे (योग्य वाटेल तसे) भेट द्या आणि त्यांचे आशीर्वाद मागा. नंतर, भक्त उरलेला हलवा पुरी आणि चणे खाऊन आणि नवरात्रीचा उपवास सोू शकतात..
संधी पूजनाचा काळ देखील या दिवशी येतो. हा दुर्गा पूजेचा सर्वात महत्वाचा विधी आहे. काही ठिकाणी जरी प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा मानली जात असली तरी, जे प्राणी बळी देण्यापासून दूर राहतात ते नारळ, केळी, काकडी आणि भोपळा यांसारख्या भाज्या किंवा फळे अर्पण करू शकतात..
अष्टमीचा शेवट आणि नवमीची सुरुवात असलेल्या संधी काळावर १०८ मातीचे दिवे लावण्याची प्रथा आहे. तुमच्या सोयीनुसार दिवे लावणे मान्य आहे.
महागौरीची पूजा केल्याने तिच्या भक्तांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सुसंवाद सुनिश्चित होतो.
दुर्गा मातेची पूजा केल्याने वाईट शक्तींशी लढण्यासाठी धैर्य आणि शक्ती मिळते.
महागौरी सर्व वाईट गोष्टी दूर करो, तुमची पापे शुद्ध करो आणि तुम्हाला आनंद आणि समाधान देवो.
दुर्गा देवी तिच्या भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मकतेवर मात करण्यासाठी शांती, संरक्षण आणि धैर्य देवो.
🙏🙏🙏
ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर
No comments:
Post a Comment