देवी कालरात्री
शुभत्व आणि धैर्याची देवी
प्राचीन ग्रंथांमध्ये देवी कालरात्री किंवा माँ कालरात्रीचे अनेक उल्लेख आहेत, परंतु तिचा उल्लेख प्रथम देवी महात्म्यात केला आहे. बऱ्याचदा ‘कालरात्री’ आणि ‘काली’ या नावांचा वापर एकाच देवीचे वर्णन करण्यासाठी केला जातो, परंतु काही जण त्यांना वेगवेगळ्या देवी मानतात. अनेकांचा असाही विश्वास आहे की देवीचे हे भयंकर रूप देवी चंडीने तिच्या कपाळावरून निर्माण केले आहे. देवी कालरात्री ही रात्रीसारखीच काळी दिसते आणि ती दुष्ट शक्तींचा, अज्ञानाचा आणि अंधाराचा नाश करण्याचे प्रतीक आहे. मग तो भौतिक अंधार असो वा व्यक्तिच्या मनातील, हृदयातील अंधार असो. तुमचे मन जितके अधिक शिक्षण आणि ज्ञाना आत्मसात करण्यासाठी खुले असेल तितके तुम्ही या देवीला प्रसन्न कराल. जे सर्व प्रकारच्या नकारात्मकतेशी लढण्यास तयार असतील त्यांच्या साठी देवी दयाळू असेल. देवी कालरात्री सहस्रार चक्रावर राज्य करते म्हणजे डोक्याच्या वरच्या बाजूला असलेले चक्र.
चंड-मुंड या राक्षसांना शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी देवी चंडीशी लढण्यासाठी पाठवले होते. जेव्हा ते दोघे आले तेव्हा देवी चंडीने देवी कालरात्री निर्माण केली, जिने चंड-मुंडाशी युद्ध करून त्यांचा वध केला आणि त्यामुळे तिला 'चामुंडी' हे नाव मिळाले.
काही ग्रंथांमध्ये देवी कालरात्रीशी संबंधित रक्तबीज या राक्षसाची कथा आहे. देवी कालरात्री बद्दलची आणखी एक कथा ती अशी की दुर्गासुराने कैलासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुर्गासुराला समज देण्यासाठी पार्वतीने देवी कालरात्रीला दूत म्हणून पाठवले. रक्षकांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आकाराने मोठी झाली आणि दुर्गासुरला इशारा दिला की तो देवी पार्वतीच्या हातून मरणार आहे - जे अखेर घडलेच आणि पार्वतीने देवी कालरात्रीचे नाव दुर्गा ठेवले.
देवी कालरात्री 'शुभ', म्हणजे चांगल्याच्या हितासाठी काम करते आणि 'अशुभ' अर्थात वाईटाचा नाश करते, म्हणून तिला 'शुभत्वाची' देवी मानतात.
देवी कालरात्रीचे चित्रात रात्रीसारखी काळी त्वचा, मोकळे केस, ती अग्नि श्वास घेते आहे असे दाखवले आहे आणि म्हणूनच तिचा चेहरा पाहणाऱ्याच्या हृदयात भीती निर्माण होते. तिचे चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार, गडगडाट करणारी वीज अथवा खड्ग किंवा कोयता आहे. तिच्या इतर दोन्ही हातांनी देवी आशीर्वाद देते व संरक्षण करते असे दिसते. ती गाढवावर म्हणजेच- ओझे वाहणा-या प्राण्यावर स्वार आहे.
देवी कालरात्रीला राखाडी, तसेच पांढरा आणि गुलाबी रंग आवडतो. तिचे आवडते फूल पॅशनफ्लॉवर आहे - जे भारतात कृष्ण कमल म्हणून ओळखले जाते.
देवी कालरात्रीची पूजा कशी करावी
२८ सप्टेंबरला पूजा सुरू करण्यापूर्वी, तुमचे मन आणि शरीर शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या मनात स्वच्छ, सकारात्मक विचार ठेवा, कोणत्याही जबरदस्तीने, दुष्ट इच्छा बाळगू नका किंवा पूजा करू नका. तुमचे मन आणि शरीर चांगले विश्रांती घेऊन शांत असले पाहिजे.
जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करत असाल तर तुम्ही ती करू शकता किंवा तुमच्या भक्तीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश त्यावर नारळ ठेवून पुजा स्थानी ठेवू शकता.
देवी कालरात्रीची मूर्ती किंवा चित्र वेदीवर चमकदार पांढऱ्या किंवा गुलाबी कापडावर ठेवा.
तुम्ही राखाडी किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालू शकता. रॉयल ब्लू रंग रात्रीच्या आकाशातील गडद निळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो म्हणून तो परिधान केला जातो.
पांढरी किंवा गुलाबी फुले किंवा जास्वंदाची फुले, शमीच्या झाडाची पाने अर्पण करा आणि शक्य असल्यास कृष्ण कमल फूल अर्पण करा!
प्रसाद किंवा नैवेद्यात - गुळ, नारळ, तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचे पदार्थ देवी कालरात्रीला अर्पण करा.
दुर्गा सप्तशती मंत्र किंवा पर्यायी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करा आणि देवी कालरात्रीसाठी मंत्राचा जप करा.
||ॐ देवी कालरात्र्यै नमः|| Om Devi Kaalratrayii Namah
अंधार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी देवी कालरात्रीसमोर दिवा आणि धूप लावा,
तुमच्या सहस्रार चक्राचे ध्यान करा आणि सर्व अंधार आणि वाईटापासून देवी तुमचे रक्षण कराे अशी प्रर्थना करा.
देवी कालरात्री तुम्हाला शांती आणि सुरक्षिततेचा आशीर्वाद देवो आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, विचार व चांगल्या भावनांना स्त्रोत देवो.
आपण येथे सर्व प्रकारच्या अंधाराचे निर्मूलन करण्याचा उल्लेख केला आहे. ज्ञानाचा दिवा लावल्याने अज्ञानाचा अंधार दूर करता येतो. आश्विन शुक्ल सप्तमीच्या या दिवशी, आपण ज्ञान आणि बुद्धीची देवी असलेल्या देवी सरस्वतीची ही पूजा करतो.
आश्विन शुक्ल सप्तमी ही तिथी २८ सप्टेंबर व २९ सप्टेंबरला येत आहे . देवी सरस्वती च्या पुजे विषयी स्वतंत्र लेख देत आहे.
🙏🙏🙏
ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर
.jpg)

No comments:
Post a Comment