मीन राशित गोचरीने शनी व राहु, शापित योग किंवा पिशाच्च योग... पहलगाम, कश्मिर येथिल आतंकवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ शकते.©

 

काल आतंकवादी हल्ला व अंक ज्योतिष याबाबत माहिती देताना मी २२/४/२०२५ रोजी असलेली अंक ज्योतिषीय व ग्रह स्थिती दिली आहे. त्याबाबत पुढील काळात घडणाऱ्या घटनांचे बाबतीत ही मी असे हल्ले होवू शकतात, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.असे म्हटले होते.

मी पुढील संभाव्य तारखा काढल्या असून सतर्कतेचा इशारा म्हणून हा लेख देण्याचे ठरविले.

(१) २६/४/२०२५, -- शनी, राहु+हर्षल,+नीच राशीत मंगळ 

शनी+ राहु शापित योग, क्रमांक ८ शनी प्रभाव, क्रमांक ४ राहु+ हर्षल प्रभाव, क्रमांक ९ मंगळ प्रभाव,व नीच राशीत मंगळ ३१ मे पर्यंत आहे.पुढील तारखांना जीथे जीथे हे क्रमांक येत आहेत त्या सर्व तारखांना कमी अधिक प्रमाणात काही विनाशकारी घटना घडू शकतात.

(२)२७/४/२०२५, अधिक गंभीर योग २७+४=३१=४आणि

२०२५ ची बेरीज=९ याप्रमाणे ४+९=१३

(३)यानंतर ३०/४/२०२५ यातील ३/४ तासच वाईट आहेत.

(४) ३मे २०२५ —३/५/२०२५ =३+५=८,व २+२+५=९

८+९= १७ = ८ (२२/४/२०२५ इतकाच वाईट)

(५) ४/५/२०२५=१८=९..हा काही प्रमाणात वाईट 

(६) ८ मे २०२५ =(८+५+२+२+५)=२२=(२+२=४)

हा २२/४/२०२५ इतकाच वाईट.

(७)१२ मे २०२५ =१२+५+२०२५=१७+९=२६=८

अतिशय गंभीर योग 

(८) १३/५/२०२५= १३+५=१८व २०२५=२+२+५=९

१+८+९=२७=२+७=९ नीच राशीत मंगळ जास्त प्रभाव

(९) या शिवाय या काळातील ४,८,१३,१७,२२,२६(मे महिन्यात) पैकी २२व २६ पिशाच्च योग १८ मे रोजी संपत आहे.पण नीच राशीत मंगळ ३१ मे पर्यंत आहे.

या सर्व तारखा वाईट घटना घडवतीलच असे नाही.पण सतर्क राहावे हे चांगले.फक्त अतिरेकी हल्ल्याच्या साठीच या तारखा दिल्या आहेत असे नाही.शनी+राहु युती योग जर कुणाच्या लग्न कुंडलीत ६/८/१२ यापैकी कुठल्याही स्थानी असेल (मीन राशित गोचरीने असेल तर) त्या व्यक्तीने ही काळजी घ्यावी.गर्दी, मोर्चा, सामाजिक संघर्ष यात भाग घेवू नये.

कालच्या लेखात मी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते दिले आहे, माझ्या अंदाजाप्रमाणे २७ एप्रिल २०२५ रोजी सुध्दा युद्ध सुरू होवू शकते, किंवा ३ मे २०२५, ८ मे २०२५ ,१२ मे २०२५ या तारखा ही त्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतात.

वृध्द राजकीय, सामाजिक नेते (विशेषतः मेष व वृश्चिक राशीच्या लोकांना) यांचेसाठी अशुभ योग.देशाच्या इतर भागातही हल्ले, आतंकवादी कारवाया, भूकंप (नैसर्गिक आपत्ती)आगी लागणे, रेल्वे अपघात होवू शकतो.

आजच्या या लेखाचा हेतू एवढाच की फक्त कश्मिर नाही कुठेही, केंव्हाही जाताना किमान या तारखा टाळा.

अनेक लोकांच्या समुहात वावरणे या काळात कमी करा.

श्री हनुमान वडवानल स्तोत्र पठण करीत रहावे.

शनी व राहु उपासना करावी.

रेखा छत्रे रहाळकर

ज्योतिष विशारदभविष्य भूषण, 

हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


शनी-राहु पिशाच्च योग लेखांक ३©

 


लेखांक १ व २ मधे उल्लेख केल्या प्रमाणे गेल्या काही दिवसातील प्रसिध्द व्यक्तींचे मृत्यू .

लोकप्रिय, वयोवृध्द अभिनेते मनोजकुमार यांचा मृत्यु, तसेच जागतीक किर्तीचे न्युरो सर्जन

डॉ.वळसंगकर यांची आत्महत्या, इतरही आकस्मिक अपघाताने मृत्यु किंवा हत्येच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच.

२८ मार्चच्या रात्री झालेला म्यानमारचा व इतर ४ देशातील भूकंप हादरवून सोडणाराच होता. त्यानंतरही काही भूकंप होत राहीले. हे सर्व मीन राशीत २९ मार्च २०२५ रोजी एकत्रित आलेल्या ग्रहांच्या युतीचे परिणाम. लोक समुहावर परिणाम करणा-या घटना अशा प्रकारे अशुभ ग्रहांचे युतीने होत असतात. कोणा एका व्यक्तीच्या पत्रिकेचे हे भाकीत नसते तर अनेक लोक समुदायावर परिणाम करणारे हे ग्रह असतात जेंव्हा ते अशा प्रकारे एकत्रित येतात.

कालचा, दिनांक २२/४/२०२५ रोजी पहलगाम, कश्मिर येथे झालेला अतिरेकी हल्ला याचे अंकज्योतिष द्वारे स्पष्टीकरण व शनी-राहु, कर्क राशीतील मंगळ इतर अशुभ योग चर्चेस घेतले आहेत.

पहलगाम- कश्मिर येथील अतिरेक्यांचा हल्ला व निरपराध २८ पर्यटकांचे मृत्यु! (मोठ्या लोक समुदायावर पिशाच्च योगाचा परिणाम) या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हे फक्त भ्याड, राक्षसी कौर्य आहे. याला अतिरेकी, अमानवी हत्याकांड याहुन दुसरे शब्द माझ्याकडे नाहीत.

मात्र पुन्हा एकदा डोळ्यात भरली ती हल्ल्याची तारीख! ‘२२/४/२०२५’?

काय आहे ह्या तारखेत प्रश्न पडला असेल तुम्हाला.

,,१३,१७,२२,२६,३१ या तारखा हे राक्षस बॉम्ब स्फोट किंवा गोळीबार, अतिरेकी हल्ला करण्यासाठी निवडतात. क्रमांक ४ वर राहु व हर्षलचा प्रभाव आहे. राहु उध्वस्त करणारा तर हर्षल विक्षिप्त, स्फोटक ग्रह आहे. क्रमांक ८ वर शनीचा प्रभाव आहे व सध्या शनी राहु पिशाच्च योग १८ मे पर्यंत आहे.२९ मार्च २०२५ ते १८ मे २०२५ हा पिशाच्च योग, लोकसमुहा करिता अशुभ आहे.

आता कालची तारीख २२ म्हणजे २+२=४, एप्रिल म्हणजे ४ था मास, दोन्हीची बेरीज ४+४=८ शनी प्रभाव. नंतर आले वर्ष २०२५= २+२+५= ९ मंगळाचा प्रभाव. सध्या गोचरीने मंगळ नीच राशीत मृत्युयोग कारक. आता दुर्दैव पहा, पूर्ण तारीख २२+४+२०२५= १७ =१+७=८ शनी!! ही या नीच क्रुर लोकांनी निवडलेली तारीख, कुठलाही तारीख निवडण्यात योगायोग नव्हे. पूर्वी मुंबई, दिल्ली, जयपूर, पूणे सर्व ठिकाणी बॉम्ब हल्ले किंवा अतिरेकी कारवायांसाठी अशाच तारखा अतिरेक्यांनी निवडलेल्या आहेत. आत्ता त्यात अशुभ ग्रहांच्या, अशुभ योगांची भर पडली आहे. अजून ही १८ मे पर्यंत पिशाच्च योग असल्याने, भूकंप, आग लागणे, जमीन खचणे ह्या घटना जशा होवू शकतात तद्वत अतिरेकी हल्ले, युध्दजन्य परिस्थिती ही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी शनी-राहु पिशाच्च योगावरील लेखमालिका पूर्ण करीत आहे.

रेखा छत्रे रहाळकर

ज्योतिष विशारदभविष्य भूषण, 

हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ

“शापित योग किंवा पिशाच्च योग”-लेखांक-२©

 


आपण ‘लेखांक -१’ मधे “पिशाच्चयोग” अथवा “शापित योग” याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. मला आपणाला मुख्यत्वेकरून हे सांगायचे आहे, की सध्या वावटळीसारखे ‘पिशाच्च’योगाबद्दल भीतीदायक वातावरण तयार केले जाते आहे. स्पष्टपणे हा जातकांना भय निर्माण करणारा प्रकार आहे म्हटले तर चूक होणार नाही. मागच्या लेखातच मी बरेचसे समजावून दिले आहे. गोचरीने तात्पुरत्या काळासाठी येणा-या या योगाचे भय बाळगू नका. इथे पितृदोष, पूर्वज, पूर्वजन्म, अशा अनेक कारणांनी याला ‘शापित’ अथवा ‘पिशाच्च योग’ म्हटले जात असले तरी आपण तसे पाहिले तर आपल्यापैकी कुणाकुणाच्या पत्रिकेत राहू आणि शनी अथवा केतू आणि शनी एकत्र असतात.
त्यालाही‘पिशाच्च योग’ असेच म्हटले जाते पण पूर्ण पत्रिका पाहूनच गांभीर्य ओळखावे. 

ज्योतिष शास्त्रात कुठल्याही व्यक्तीचे पत्रिकेत प्रथम भावात राहू ,पाचव्या भावात शनि आणि नवम् भावात मंगळ असेल तर या स्थितीलाही ‘पिशाच्च योग’ म्हणतात. कुठल्याही व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय भावात राहू किंवा केतू, किंवा चतुर्थ भावात राहू किंवा केतू असतील तर तोही शापित योग मानला जातो. या सर्वाचा पूर्वजन्म, पूर्व जन्मातील कर्म दोष या सर्वांशी संबंध आहे. एवढेच ध्यानी घ्यावे व चिंता करू नये. या ठिकाणी ज्यांच्या पत्रिकेत राहु व शनी एकत्र आहेत अशा काही व्यक्तींची नावे मी देत आहे. (१) अमेरिकन टेनिस पटू, मार्टिना नवरातिलोवा- शनी+राहु अष्टम स्थानी युती, (२) सनी देओल- फिल्म अभिनेता व राजकारणी, ( पूर्व एम.पी.(गुरुदासपूर))- धनु लग्न असून व्ययस्थानात शनी+राहु युती, (३) अर्षद वारसी- बॉलीवुड अभिनेता - कर्क लग्न, लग्नी शनी+राहु युती.

सांगायचे तात्पर्य अशुभ योग असले तरी व्यक्ती स्वतःच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात. छोटेसे रोपटे लावल्यानंतर त्याला ऊन, पाऊस, वारा, सूर्य प्रकाश सर्वाचि गरज असतेच. नाहीतर, ते रोप कोमेजून जाते. तद्वत प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडताना सुख,दु:ख, कधी अपेक्षा पूर्ती तर कधी घोर अपेक्षा भंग, मान-अपमान अशा घटनांनी पैलू पडतात व अष्टपैलू व्यक्तिमत्वे घडतात. सूवर्ण जसे आगीतून शुद्ध होवून उजळते तसेच साडेसातीतून तुमची कार्यक्षमता वाढते, सहनशीलता, सत्वगुणाची जोपासना केली जाते.

शनी मीन गोचर भ्रमण असताना इतर काही चांगले योग ही जुळून आले आहेत. षष्ठग्रही योग - देवगुरु बृहस्पतींच्या मीन राशीत शनी, राहू, सूर्य, चंद्र, शुक्र, बुध हे ग्रह असता शनी+राहू शापित योग व शनी+चंद्राच्या विष योगा शिवाय बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, बुध शुक्र लक्ष्मी नारायण योग हे तीन अतिशय उत्तम योग मीन राशीत होणार आहेत. मीन चंद्र रास असणा-या जातकाला याचा फायदा होणार आहे.

  मीन राशीतून शनीचे गोचर भ्रमण -

सध्या मीन राशीत होणार्‍या शनी व राहू युतीचे इतर परिणाम- दैनंदिन जीवनात परिश्रम, कष्ट यात वाढ होणार ते बाराही राशींसाठी आहे. सर्व कामे मंद गतीने पण शिस्तीत होतील. मेष, मीन, कुंभ, धनु, सिंह या पाच राशींना इतर सात राशींपेक्षा अधिक कष्ट अधिक दु:ख आहे. या जोडीला कुंभ व मीन राशींना ज्ञान व सत्संग याचा लाभ आहे. अध्यात्मिक व्यक्तींचे मार्गदर्शन, सहवास लाभु शकतो. त्याचा पुढील जीवनात कायमचा प्रभाव राहील. मेष, धनु व सिंह या राशींच्या व्यक्तींनी उतावळेपणा करू नये. विधीलिखित चुकत नाही. घडणारे घडतच असते. कर्मभोग सर्वांनाच भोगून संपावयाचे आहेत. तुम्हाला उपाय व उपासना यामुळे संकटांची एक तर तीव्रता कमी करता येईल किंवा तीव्र कठोर परिस्थिती हाताळण्याची स्वतःची कार्यक्षमता, सहनशीलता वाढविता येईल. सावध पाऊले टाकल्यास, मित्र कोण व शत्रू कोण याची ओळख होईल. शनी बरोबर असताना राहू काही मर्यादेत आहे ही जमेची बाजू आहे. एरवी राहू सर्वच राशींना चकवा देणारा होवू शकतो. शनी राहू युती कायद्याच्या कक्षेत काय घडवू शकते, तर शनि कधीही सत्याची साथ सोडत नाही आणि राहू मात्र तुमच्या शत्रूलाही जाऊन मिळतो. हीच कोंडी फोडण्याची ताकद मिळवण्यासाठी सन्मार्गावरच रहा, सत्य बोला, धीर धरा, कोणालाही अपशब्द वापरू नका, गैर मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी, याठिकाणी कोर्टकचेरी साठी उपाय- हनुमान चालीसा दररोज तीन वेळा म्हणून एकूण चाळीस (४०) वेळा पूर्ण करा. कोर्टदाव्यात यशासाठी श्री हनुमान वडवानल स्तोत्र १,,,,,११ वेळा दररोज म्हणावे (यासाठी पूर्वी दिलेली पोस्ट पहावी)

  साडेसाती परिणाम व उपासना -

अ) मीन राशीसाठी- [साडेसातीचे द्वितीय 'अडिचके']– गोचर भ्रमण सुरू असताना, देवबृहस्पतींची ज्ञानी राशी मीन व नक्षत्रे‘पूर्वाभाद्रपदा’ आणि‘उत्तराभाद्रपदा’ तसेच बुध स्वामी असलेले नक्षत्र रेवती यातून गोचर विशेष प्रभावी असेल. गोचरीने शनिदेव एकादश व द्वादश दोन्ही भावात स्वामी म्हणून असतील. प्रत्यक्षात‘द्वादश’ म्हणजेच‘व्ययस्थान’ हे शनीचे स्थान आहे. मीन चंद्र राशीत, प्रथमस्थानी शनिदेव असताना या ठिकाणाहून तिसरे, सातवे व दहावे स्थानी शनीची दृष्टी असेल. भावंडांबरोबर संबंध चांगले राहतील. बिघडले असले तरी सुधारतील. जोडीदाराशी मात्र जमवून घ्यावे लागेल. वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात थोड्याफार कटकटी संभवतात. जोडीदाराची प्रकृती सांभाळावी. नोकरी व व्यवसाय क्षेत्रात यश भरपूर आहे. नोकरीत असल्यास मानसन्मान, पदोन्नती आहे. जुलै २०२५ ते नोव्हेंबर २०२५ मानसिक चिंता व प्रकृती दोन्हीवर दुष्परिणाम संभवतो. तेंव्हा आधीपासूनच काळजी घ्या.

उपाय व उपासना - शनिवारी काळ्या वस्तूंचे, लोखंडाचे दान करा. शनि मंदिरात शनि मूर्तीवर तेलाचा अभिषेक, तसेच वृद्ध, दिव्यांगी, दुबळे, अति गरीब व्यक्तींना भोजनदान द्या. कपडे द्या. अंथरूण पांघरूण द्या. {रग, चादर इत्यादी} तसेच कावळा व काळे कुत्रे यांना भाकरी अथवा पोळी खाऊ घाला. शनिवारी उपवास करावा. शनि महात्म्य दररोज वाचावे किंवा ऐकावे. मारुती स्तोत्र पठण करावे.

         



ब) कुंभ राशी- [साडेसाती चे तिसरे व शेवटचे 'अडीचके']- शनी या राशीचा स्वामी असल्याने इतर राशींच्या मानाने कुंभ राशीच्या जातकांना साडेसाती सुसह्य असते. त्यात आता तर शेवटचे अडीचके सुरू होत आहे. पण हुरळून जावू नका. आपण कधी दुसर्‍याच्या मुलांना जास्त शिस्त लावायला जातो का? सेम तस्सेच कधी कधी घडते बरं! थप्पड, छडीचा मार आपल्याच पोरांना शनिदेव जरा जास्तच देतात [ही मंगळाची पण ख्याती आहे]. उद्देश एकच असतो, दुसरा कोणी आपल्या पोराला नांवे ठेवू नये. तर हे सर्व तुम्ही गेली पाच वर्षे सहन केलेले आहे. आता अजून फक्त अडीच वर्षे! काळ थोडासा वाटला तरी अजून दोन वर्षे खडतर आहेत, नंतरचे सहा महिने शनी कृपेचे असतील. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. गेल्या पाच वर्षांत कुणाचे पितृछत्र किंवा मातृछत्र हरपले असेल, दुःखाची कळ अजूनही असणार, त्यात फुंकर घालत ज्यांचे विवाह लांबले आहेत वय जास्त होवून ही त्यांचे विवाह झाले नाहीत त्यांना योग्य जोडीदार शनिदेव मिळवून देतील. कुठे कुठे वैवाहिक जीवनात अपत्य सुख नाही एवढीच कमतरता आहे तिथे अपत्य प्राप्ती होईल. नोकरी, व्यवसाय क्षेत्रात यश असे राहून गेलेली पारितोषिके देवूनच शनिदेव २०२७ मधे निरोप घेतील. तुम्ही मात्र आता पासून उपाय, उपासना करावी.

उपाय व उपासना- नवग्रह स्तोत्र पठण, काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे, शनिवारी चढते उतरते दिवे लावा. दर शनिवारी काळी उडद डाळ व मोहरीचे तेल गरीबांना दान करा.

     


(क) मेष राशी-[साडेसातीचे प्रथम चरण पहिले, 'अडिचके']- मेष राशीस बारावा शनी येत आहे. अति क्रूर, क्रोधी, कठोर, त्यात मेष राशीचा स्वामी मंगळ हा शनीचा शत्रु आहे म्हणजेच शनी खूप काही नुकसान करणारा आहे असे समजायचे कारण नाही.

मेष राशीच्या जातकांना साडेसातीचे हे पहिले अडिचके कठीण जाणार एवढे उघड आहे स्वतःची पत्रिका नजरे समोर आणा. मेष रास जन्म-चंद्र कुंडली. व्ययात द्वादश स्थानात मीन राशीत शनिदेव व सध्या काही काळ इतर पाच ग्रह.

षष्ठ स्थानात केतू. बाकी गोचर ग्रह सध्या बघण्याची तेवढी गरज नाही. कारण सहा ग्रह व्ययात, चंद्र प्रथम व केतू षष्ठात. व्ययस्थान म्हणजे खर्चाचे प्रमाण वाढेल, प्रवास भरपूर होणार आहेत, कायमच ट्रेन किंवा विमानात वास्तव्य म्हणायला हरकत नाही. मित्रांसाठी सढळ हाताने खर्च करणार आहात मदत स्वरूपात, पण सावधान एखाद्या मित्राच्या कडूनच फसवणूक होवू शकते. मित्राला मदत करु नका असे नाही पण डोळे उघडे ठेवून मदत करा. तुमच्या नाही तर तुमच्या कुटुंबियांवर आरोग्यासाठी खर्च होणार, अध्यात्मिक बनाल. तीर्थक्षेत्र, देऊळे भेटी दिल्या जातील तिथे दान धर्म कराल. हरकत नाही. कुठलाही खर्च करा पण फसवणूक होणार नाही त्यातूनच कायद्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे. कुठल्याही प्रकारचे कारणाने कोणी हितशत्रू दोषारोप करू शकतो अशी ग्रहस्थिती आहे व सावध करणे माझे कर्तव्य आहे.

एरवी नोकरीत लाभ, पदोन्नती, अधिकार पदावरील नियुक्ती, आर्थिक स्थिती उत्तम, विवाह योग्य वय असेल तर विवाह संभवतो. आरोग्याचे बाबतीत वाहन भरधाव वेगाने चालवू नये. अन्नातून विषबाधा होऊ शकते शिळे अन्न खाऊ नये.

उपाय व उपासना - शनिवारी बजरंग बाण पाठ करावा.

     


ड) धनु रास चवथा शनी (शनी ढैय्या)- शनीची ढैय्या अडीच वर्षे म्हणजे ३० महिने आहे. तुमच्या जन्म राशीत म्हणजे चंद्र राशीत चतुर्थ स्थानी मीन रास येते. या ठिकाणी शनिदेव गोचरीने येत आहेत. हे मातृ स्थान आहे. शनीची ढैय्या वृद्ध व्यक्तींसाठी अवघड आहे. आईस, सासूला तसेच वडील व सासरे यांच्या प्रकृती संभाळावे. शनी मीन राशीत येत आहे त्यात आधीचे इतर ग्रह आहेत या सर्वांची सातवी दृष्टी कर्म स्थानावर म्हणजेच दशम स्थानी आहे. नवीन नोकरी, प्रमोशन, नोकरीत बदल होताना अधिक उच्च पदावर नियुक्ती, मात्र अनेक अडथळे येतील. राहण्याचे ठिकाण बदलू शकते. नवीन घर विकत घेण्याची संधी येईल पण कर्जाचा बोजा वाढेल. परदेशी नोकरी निमित्त जाण्याची शक्यता. प्रकृतीस सांभाळून राहावे. संताप करू नये. अपशब्द वापरू नये. शांत डोक्याने विचार करीत काम करणे आवश्यक. आरोग्याचे बाबतीत- पचनाचे विकार, बीपी वाढू शकते किंवा अति काळजी मुळे हृदयविकार होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक. कारण चतुर्थात रवी व राहू पण आहेत.

उपाय व उपासना- नवग्रह स्तोत्र नियमित म्हणावे, “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र दररोज २३ वेळा म्हणावा. शनिवारी उपवास करावा.


ई) सिंह रास आठवा शनी (शनी ढैय्या) - धनु राशीप्रमाणे सिंह राशीस शनी ढैय्या अडीच वर्षे आहे. सिंह राशिस आठवा शनी आहे येत आहे. कष्ट, श्रम आर्थिक नुकसान सर्व ठिकाणी दुय्यम वागणूक, असे ग्रहमान या जंगलच्या राजाचे आहे. मवाळ धोरणच या शनी ढैय्येमधे नैय्या पार करण्यासाठी अवलंबावे लागेल.कुठलाही प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता इतरांना बरोबर घेऊन चाललात तर यशात सिंहाचा वाटा मिळूही शक्यतो. राजकारणी व्यक्ती, तुम्ही धोरण पाहून तोरण बांधण्यात वाकबगार. कोण म्हणतं सिंह लबाडी करत नाही? त्याची लबाडी इतरांना घातक नसते इतकेच. स्वत:चा हिस्सा तो कधीही सोडणार नाही. तो राजा आहे, राजासारखा वागतो.

उपाय व उपासना- नवग्रह स्तोत्र नियमित म्हणावे, “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र दररोज २३ वेळा म्हणावा. शनिवारी उपवास करावा.

       




     

 रेखा छत्रे रहाळकर

  ज्योतिष विशारदभविष्य भूषण,

 हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ







‘शापित योग किंवा पिशाच्च योग’ - लेख १

 

                              


सध्या एकच गहन चर्चा ज्योतिष क्षेत्रात सुरू आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनी गोचर मीन राशीतून सुरू होत आहे. मीन राशीत प्रथमपासून म्हणजेच साधारण गेले दीड वर्ष राहू आहे. राहूची ही धास्ती बऱ्याच जातकांना आणि इतर लोकांनाही नेहमीच वाटते. राहू महादशा, अंतर्दशा, राहू विदशा, पत्रिकेतील राहू ज्या भावात आहे त्याची उत्सुकता असते. आता प्रत्यक्ष शनिदेव ही मीन राशीत प्रवेश करणार असल्याने ही उत्सुकता ताणली गेली तर नवल नाही. सध्या तरी २२ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत शनिदेव ‘अस्त’ अवस्थेत आहेत. जरी २९ मार्च २०२५ रोजी शनीचा प्रवेश मीन राशीत होत असला तरी तो प्रवेश ‘अस्त’ अवस्थेत आहे. ३१ मार्च २०२५ ला शनि उदित होतील.

शनि गोचर एका राशीमध्ये अडीच वर्षे म्हणजे ३० महिने असते. मीन राशीत पहिला, कुंभेस दुसरा, मकर राशीत तिसरा, धनु राशिस चवथा, वृश्चिकेस पांचवा, तुळेस सहावा, कन्येस सातवा, सिंह राशीस आठवा, कर्केस नववा, मिथुनेस दहावा, वृषभेस अकरावा, आणि मेषेस बारावा याप्रमाणे शनि प्रत्येक राशीत येत आहे. २९ मार्च २०२५ ते २ जून २०२७ पर्यंत शनी यानुसार प्रत्येक राशीत आहे. २०२७ ला तो मेष राशीत प्रवेश करेल.

सध्या मीन राशीत पहिला शनी येत असल्याने मीन राशीचे साडेसातीचे दुसरे अडीचके सुरू होत आहे. कुंभेचे तिसरे म्हणजेच शेवटचे अडीचके सुरू होत आहे. मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीस साडेसाती सुरू होत आहे. शनीची ‘ढैय्या’ म्हणजेच ‘पनौति’ (छोटी साडेसाती असे ही म्हणतात) धनु व सिंह राशीस सुरू होत आहे, कंटक शनी दशा, कर्क राशीची संपून सिंह राशीस प्रारंभ होईल. धनु राशीत चवथा व सिंह राशीत आठवा शनी आहे.

साडेसाती इतकेच चवथा व आठव्या शनीचे भय लोकांना जाणवते. तसे भय बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही मात्र काही बंधने स्वतःवर वागणे, बोलणे याबाबतीत घालून घेतलेली चांगली. त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करूच. आज आपण मीन राशीतील शनि आणि राहू दोन्हीही अशुभ ग्रह एकत्र येत आहेत, हा “पिशाच्च योग” बनतो त्याबाबत माहिती घेणार आहोत. सध्या मीन राशीत शनी प्रवेश झाल्यावर एकूण सहा ग्रह मीन राशीत असणार आहेत. रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, आणि नेपच्यून यापैकी रवी १३ एप्रिलला मेषेत जाईल, तर राहू १८ मे ला कुंभेत जाईल.

चंद्र राशीतून शनीचे भ्रमण म्हणजेच साडेसाती. साडेसातीचे काळात शनी न्याय करतो. शनी न्यायाची देवता आहे. ‘कुकर्म’ करणाऱ्यांना शासन व ‘सत्कर्म’ करणाऱ्यांना पारितोषिक हा शनीचा नियम आहे. अहंकारी, गर्विष्ठ, उद्धट, कामचुकार, बेशिस्त व्यक्तींना शिस्त लावण्याचे काम या साडेसातीत शनिदेव करीत असतात. गुणीजनांचीही परीक्षा घेत ते त्यांच्यातल्या गुणांना संकटांच्या कसोटीवर उतरवितात. म्हणूनच शनिदेव क्रूर, क्रोधी, दृष्ट वाटतात. कारण फार मोठ्या कठोर शिक्षा ते देतात. अनेक रेंगाळलेली कामही ते शिस्तबद्ध पद्धतीने नशिबाचे फटकारे मारत पण पूर्ण करून देतात. उदाहरणार्थ घर, नोकरी, प्रमोशन, विवाह इत्यादी त्यामुळे शनिदेव अशुभ वाटले तरी शेवटी शुभच घडवून जातात. मात्र साडेसात वर्षात केव्हांही घोर संकटांचा सामना करावा लागतो. यात अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, छल कपटाने आरोप किंवा प्रत्यक्ष चुकांमुळे ही स्थानबद्धता, जेल, शिक्षा या गोष्टी घडतात. आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शनि अतिशय अशुभ वाटतात व त्यांची धास्ती सर्वांनाच वाटते. याचवेळी राहू सारखा अशुभ ग्रह ही मीन राशीत गेले दीड वर्ष आहे व अजून १८ मे पर्यंत आहे म्हणजेच २९ मार्च २०२५ ते १८ मे २०२५ राहू व शनी हे दोन्ही अशुभग्रह एकत्रित असल्याने हा योग “शापित योग” किंवा “पिशाच्च योग” घडून येत आहे. आता याला पिशाच्च योग म्हणायचे कारण काय तर शनी जसा आयुष्य अथवा मृत्यू कारक ग्रह आहे तसा राहू हा पूर्वजन्म त्यातील कर्म याचा द्योतक आहे. राहू, केतू हे जन्म-पुनर्जन्म यांच्यामधील एक ‘पंप’ आहेत. राहू म्हणजे सर्पाचे तोंड तर केतू म्हणजे सर्पाचे धड व शेपूट पूर्वकर्मातील बऱ्या वाईट कर्माची फळे ज्ञानाच्या पोकळीतून केतूकडे पाठवून राहू ते भोगावयास भाग पाडतो. सहजच आपल्या मनात येते की असे काही घडायला नको होते पण राहू केतूचा महत्त्वाचा भाग म्हणजे हा राहू केतू हे पातबिंदू असले तरी त्यांच्यात १८० अंश अंतर असते, म्हणजेच ते पत्रिकेत समोरासमोरचे घरात असतात. त्यामुळे राहूची सातवी दृष्टी केतूवर तर केतूची सातवी दृष्टी राहू वर असते हे विसरून चालणार नाही. आता या ठिकाणी मीन राशि मध्ये राहू आहे. यामध्ये तो शनी बरोबर आहे म्हणजेच शनि आणि राहू या दोघांच्या सातव्या दृष्टीचे परिणाम समोरच्या घरात म्हणजेच कन्या राशीत भोगावे लागणार. तसेच निसर्ग कुंडलित मीन रास १२ व्या स्थानी म्हणजेच व्ययस्थानी येत आहे. व्यय स्थानाच्या बरोबर समोरचे प्रतियोगातील सहाव्या स्थानावर शनी आणि राहू यांची दृष्टी असणार आहे. अर्थातच आरोग्याला बाधक अशी ही दृष्टी असल्यामुळे हा एक ‘अशुभ योग’ होत आहे. ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत अशी परिस्थिती आहे. त्यांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यकच आहे. शनी आणि राहू यामध्ये राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे म्हणजेच बोलीभाषेत दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. तेव्हा जातकाने सावध राहूनच या योगाकडे बघणे आवश्यक आहे. फसवणूक, चोरी, आरोप, गहन नुकसान किंवा अतिशय चांगल्या व्यक्तीबरोबर अतिशय वाईट वितुष्ट अशा तऱ्हेचे परिणाम भोगावे लागतील. केवळ यासाठी शनि आणि राहुच्या युतीला ‘शापित योग’ किंवा ‘पिशाच्च योग’ म्हटले असावे. आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथातून याचा उल्लेख आहे पण हा तितकाच सत्य परिस्थिती बरोबर पूर्व जन्माशी निगडित असल्याने फक्त त्याला पिशाच्च किंवा काही ठिकाणी तर प्रेत योग संबोधलेले आहे. माझ्या मते प्रेत योग याचा या ठिकाणी म्हणजे आत्ताच्या शनी ग्रहाच्या व गोचर भ्रमणाशी काहीही संबंध नाही. जरी असे दिसत असेल की या शापित योगाच्या काळात काही वृद्ध व्यक्तींचे मृत्यू संभवतात.

मेदनीय परिस्थितीचे अवलोकन करता सर्व जगतात आकाशातील गृहस्थिती परिणाम करत असते. याचा अतिशय वाईट अनुभव आपण २०२० मध्ये, कोरोना साथीचे काळात बुध-राहूची जी अशुभयुती अंतराळात होती, त्याच्या परिणामने जे भोगावे लागले ते भयानक होते. अशा तऱ्हेची काही परिस्थिती जरी शनी-राहू मुळे, शनी राहूचे शापित योगामुळे उपस्थित होत असली तरी मीन राशीत इतरही चार ग्रह आहेत. त्यामुळे ही परिस्थिती सर्व ठिकाणी तेवढी वाईट होणार नाही. काही ठिकाणी हे परिणाम भोगावे लागतील याबाबतीत दुमत असण्याचे कारण नाही. काही आशादायक गोष्टी मी तुम्हाला या लेखात सांगत आहे. यासाठी अर्थातच ‘बृह्तसंहिता’, ‘ज्योतिष रत्नाकर’ व इतरही काही ग्रंथांचा किंवा काही ज्योतिर्विंदांचे लेख व सुप्रसिद्ध पुस्तकांचा अभ्यास करूनच मी हे लिहीत आहे.

आता या ठिकाणी इतर चार ग्रहांचे कसे सहकार्य मिळाले आहे ते आपण पाहूयात. यासाठी काही नमुना कुंडल्या मी दिलेल्या आहेत.

(कुंडली क्रमांक १, संदर्भ दाते पंचांग, रवी राशी कुंडली ) २९ मार्च २०२५ पहाटे, ५.३० वा. - मीन राशीत शनी प्रवेश होण्यापूर्वी रवी, बुध, शुक्र, राहू व नेपच्यून हे पाच ग्रह उपस्थित आहेत. आता २९ मार्चला शनी २१.४२ वा मीन राशीत प्रवेश करतो, त्यावेळीही हे पाच ग्रह तिथेच आहेत. या ग्रह स्थितीचे भय बाळगण्याचे कारण नाही, उलट हे ‘शापित योग’ किंवा ‘पिशाच्च योगाची’ तीव्रता कशी कमी करतात ते आपण पाहूया.

रवी आणि शनि हे पिता-पुत्र आहेत. जरी हे एकमेकांचे शत्रू असले तरी, नाते कुठे जात नाही. ज्या ज्या वेळी रवी-शनी एकत्र येतील त्या त्या वेळी शनि हा रवीला पोषक असेच काम करतो किंवा रवीच्या म्हणजे पित्याच्या आज्ञेत राहतो व रवी पुत्राला म्हणजे शनिला संभाळून घेतो. या युतीमुळे शनीचे कोपामुळे होणाऱ्या घटना तितक्या तीव्र होणार नाहीत. तसेच ज्या वेळी शनि आणि राहू एकत्र येतात त्यावेळी ते स्वतःच्या स्वतंत्र योगाचे महत्व व त्याची तीव्रता कमी करतात आणि काही ठिकाणी बरोबर उलट म्हणजेच चांगल्या योगासाठी एकमेकांना पूरक भूमिका घेतात. थोडेसे आश्चर्यकारक हे विधान वाटेल पण राहू हा कर्तुत्वाला, बुद्धीला चालना देणारा ग्रह आहे हे विसरून चालणार नाही. राहू म्हणजे सापाचे डोके या ठिकाणी जशी काही वेळेस फसवेगिरीची कामे राहू बुद्धीच्या जोरावर करतो तशी काही उत्तमोत्तम यशदायी अशी उत्कृष्ट कामे ही राहू बुद्धीच्या जोरावरच जातकाकडून करून घेतो. त्यातच शनीच्या युतीत असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने जातकाची कामे अधिकच होतात. यामध्ये पुन्हा रवी हा शासक आणि सर्व ग्रहांचा राजा, कर्तुत्वाला वाव देणारा, बरोबर बुधही बुद्धिमत्तेला तेज देणारा आणि शुक्र हा धन, संपत्ती, कीर्ती, यश याचा वर्षाव करणारा असे हे ग्रह मीन राशीत एकत्रित असताना या शापित योगाचा तेवढा परिणाम गंभीर स्वरूपात होणार नाही हे निश्चित. दुसरे असे, की प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती नुसार या योगाचे साद पडसाद पडतील. तेंव्हा मनातले भय पूर्णपणे काढून टाका. साडेसाती असो पनौती असो त्याला धैर्याने सामोरे जा, कारण जरी का चवथा, आठवा, बारावा शनी येत असेल तरीही या तिन्ही राशी अग्नी तत्वाच्या राशी आहेत हे विसरून चालणार नाही. कर्तुत्ववान, धैर्यशील, पराक्रमी अशा या तीन राशी आहेत.

(कुंडली क्रमांक ३, उदाहरण - मेष राशीच्या अनामिक व्यक्तीची चंद्र कुंडली) मेष राशीचा स्वामी मंगळ, हा अचूक निर्णय क्षमता देतो. पराक्रम देतो. मात्र घाई घाईने निर्णय घेण्याची चूक करू नये. त्याचे चिन्ह मेष म्हणजे मेंढा म्हणजे अविचाराने कुठेतरी डोके आपटून घेणे हे होऊ शकते. ते होणार नाही याची काळजी घेणे. आता धनु राशि- धनु राशीचे चिन्ह आहे अर्धा भाग अश्वाचा आणि अर्धा भाग धनुष्य घेतलेला मनुष्य. ‘लक्ष्यावर’ ‘लक्ष’ ठेवणारी ही रास आहे. हातात तीर कमान आहे, नजर पूर्णपणे तीक्ष्ण व ध्येयावर रोखलेली आहे. उरलेला अर्धा भाग अश्वरूप म्हणजेच गतिमान, व धांवण्याच्या तयारीत आहे. अशा धनु राशीच्या पराक्रमी व्यक्तींनी चवथा शनी येतो आहे म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र अहंकार, उद्धटपणा, कामाची घिसाडघाई, व अनुभवी लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष या गोष्टी करू नयेत. थोडा शांत डोक्याने विचार करून, शिस्तबद्ध, चिकाटीने काम करावे. हे करून घेण्यासाठी शनिदेव येत आहेत, हे लक्षात ठेवावे. सिंह रास - ही राजाची रास आहे म्हणजेच जंगलच्या राजाची रास. ‘हम करे सो कायदा’ हे धोरण थोडे बाजूला ठेवा व अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती ही दूर ठेवा. मवाळ धोरण ठेवा. कार्यरत जरूर रहा मात्र इतरांच्याही अधिकाराची जाणीव ठेवून मिळते-जुळते घ्या, हे सांगण्यासाठी शनिदेवांची कंटक दशा येत आहे.

आपण चवथा शनी, आठवा शनी आणि बारावा शनी यांच्याबाबत माहिती घेतली. या ठिकाणी शनीची तिसरी, सातवी व दहावी दृष्टी कुठे येते हे ही लक्षात घेता येईल, शनि हा स्थानाला यश आणि दृष्टीला अशुभ परिणाम देतो. इतकेच लक्षात ठेवावे.

(कुंडली क्रमांक २, संदर्भ दाते पंचांग, . रवी राशी कुंडली ) रवी हा १३ एप्रिल रोजी मेषेत जात आहे. म्हणजेच १३ एप्रिल २०२५ ते १८ मे २०२५ हे दिवस थोडे धोक्याचे आहेत असे मानायला हरकत नाही. आता सर्वत्र परिणाम म्हणजे सर्व प्राणीमात्र, भूमी, पर्जन्य, वनस्पती या सर्वांवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे. या काळात उष्णतेमुळे आगी लागण्याचे, वणवा पेटण्याचे, अनुभव येऊ शकतात. इलेक्ट्रिक वस्तू किंवा विजेचे शॉक किंवा शॉर्ट सर्किट मुळे लागणारी आग या गोष्टी घडू शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वृद्ध व्यक्तींचे मृत्यू होऊ शकतात. यामधेही शासकीय नोकरीतील तसेच अधिकार पदावरील पूर्वी काम केलेले निवृत्त अधिकारी, किंवा सत्तेतील व राजकारणी सध्या वृद्ध अवस्थेतील नेते, नाट्य, क्रीडा क्षेत्रातील नामवंत, सुप्रसिद्ध वयस्कर व्यक्ती फक्त भारतात नव्हे तर सर्व जगात ज्यांचे नाव गाजले आहे किंवा गाजते आहे पण वृद्ध आहेत, अशांना निश्चितच हा काळ कठीण आहे व अशा व्यक्ती आपण गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तूर्त इथेच लेख संपवून पुढील लेखांक २ हा साडेसाती अथवा पनौती वर काही कुंडल्यांसह देण्याचा प्रयत्न करेन व उपासना ही दिली जाईल.



     रेखा छत्रे रहाळकर

    ज्योतिष विशारदभविष्य भूषण, 

हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ





सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...