लेखांक १ व २ मधे उल्लेख केल्या प्रमाणे गेल्या काही दिवसातील प्रसिध्द व्यक्तींचे मृत्यू .
लोकप्रिय, वयोवृध्द अभिनेते मनोजकुमार यांचा मृत्यु, तसेच
जागतीक किर्तीचे न्युरो सर्जन
डॉ.वळसंगकर यांची
आत्महत्या, इतरही आकस्मिक अपघाताने मृत्यु किंवा हत्येच्या
बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच.
२८ मार्चच्या रात्री
झालेला म्यानमारचा व इतर ४ देशातील भूकंप हादरवून सोडणाराच होता. त्यानंतरही काही
भूकंप होत राहीले. हे सर्व मीन राशीत २९ मार्च २०२५ रोजी एकत्रित आलेल्या
ग्रहांच्या युतीचे परिणाम. लोक समुहावर परिणाम करणा-या घटना अशा प्रकारे अशुभ
ग्रहांचे युतीने होत असतात. कोणा एका व्यक्तीच्या पत्रिकेचे हे भाकीत नसते तर अनेक
लोक समुदायावर परिणाम करणारे हे ग्रह असतात जेंव्हा ते अशा प्रकारे एकत्रित येतात.
कालचा, दिनांक २२/४/२०२५ रोजी पहलगाम, कश्मिर येथे झालेला
अतिरेकी हल्ला याचे अंकज्योतिष द्वारे स्पष्टीकरण व शनी-राहु, कर्क राशीतील मंगळ इतर अशुभ योग चर्चेस घेतले आहेत.
पहलगाम- कश्मिर येथील
अतिरेक्यांचा हल्ला व निरपराध २८ पर्यटकांचे मृत्यु! (मोठ्या लोक समुदायावर
पिशाच्च योगाचा परिणाम) या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हे फक्त भ्याड, राक्षसी कौर्य आहे. याला अतिरेकी, अमानवी हत्याकांड याहुन
दुसरे शब्द माझ्याकडे नाहीत.
मात्र पुन्हा एकदा
डोळ्यात भरली ती हल्ल्याची तारीख! ‘२२/४/२०२५’?
काय आहे ह्या तारखेत
प्रश्न पडला असेल तुम्हाला.
४,८,१३,१७,२२,२६,३१ या तारखा हे राक्षस
बॉम्ब स्फोट किंवा गोळीबार, अतिरेकी हल्ला
करण्यासाठी निवडतात. क्रमांक ४ वर राहु व हर्षलचा प्रभाव आहे. राहु उध्वस्त करणारा
तर हर्षल विक्षिप्त, स्फोटक ग्रह आहे. क्रमांक ८ वर शनीचा प्रभाव आहे व
सध्या शनी राहु पिशाच्च योग १८ मे पर्यंत आहे.२९ मार्च २०२५ ते १८ मे २०२५ हा
पिशाच्च योग, लोकसमुहा करिता अशुभ आहे.
आता कालची तारीख २२
म्हणजे २+२=४, एप्रिल म्हणजे ४ था मास, दोन्हीची बेरीज ४+४=८ शनी प्रभाव. नंतर आले वर्ष २०२५= २+२+५= ९ मंगळाचा
प्रभाव. सध्या गोचरीने मंगळ नीच राशीत मृत्युयोग कारक. आता दुर्दैव पहा, पूर्ण तारीख २२+४+२०२५= १७ =१+७=८ शनी!! ही या नीच क्रुर लोकांनी निवडलेली
तारीख,
कुठलाही तारीख निवडण्यात योगायोग नव्हे. पूर्वी
मुंबई,
दिल्ली, जयपूर, पूणे सर्व ठिकाणी बॉम्ब हल्ले किंवा अतिरेकी कारवायांसाठी अशाच तारखा
अतिरेक्यांनी निवडलेल्या आहेत. आत्ता त्यात अशुभ ग्रहांच्या, अशुभ योगांची भर पडली आहे. अजून ही १८ मे पर्यंत पिशाच्च योग असल्याने, भूकंप, आग लागणे, जमीन खचणे ह्या घटना
जशा होवू शकतात तद्वत अतिरेकी हल्ले, युध्दजन्य परिस्थिती ही
निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी शनी-राहु पिशाच्च योगावरील
लेखमालिका पूर्ण करीत आहे.
रेखा छत्रे रहाळकर
ज्योतिष विशारद, भविष्य भूषण,
हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ
No comments:
Post a Comment