आजचे पंचांग - 15 जानेवारी 2022

 १५ जानेवारी २०२२

आजचे संक्रमण


महिना- पौष, तिथी- त्रयोदशी 24:59:18 पर्यंत, दिवस- शनिवार, संवत- 2078,


नक्षत्र- मृगशीर्ष 23:21:11 पर्यंत, योग: ब्रह्म- 14:31:02,  करण- कौलव- 11:41:58, तैतिल- 24:59:18,


सूर्योदय: 07:09:56, सूर्यास्त: 18:18:04, चंद्रोदय: 16:06:00


  • चंद्र 09:50:54 पर्यंत वृषभ राशीत असेल


आजची ग्रहांची स्थिती आणि कुंडली


सूर्य- मकर, चंद्र- वृषभ, मंगळ- वृश्चिक, बुध- मकर, गुरू - कुंभ, शुक्र- धनु,


शनि- मकर, राहू- वृषभ, केतू-वृश्चिक, हर्षल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- मकर



आजचा दिवस कसा असेल- 


मेष- तुमचे भविष्य सुरक्षित करण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे आणि आज तुमच्या सक्रिय मेंदूतून कल्पना मुक्तपणे प्रवाहित होतील. सुरक्षित आणि आनंदी जीवनासाठी आर्थिक तसेच भावनिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. तुम्ही तेच करण्यात दिवस घालवाल. संध्याकाळी आराम करा आणि तुमची सर्जनशीलता कविता, चित्रकला, संगीत किंवा इतर कोणत्याही कलेच्या क्षेत्रात वाहू द्या. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित कराल.


वृषभ- अरे वृषभ व्यक्तिंनो, आज तुम्ही सगळ्यांना वेड लावणार आहात! एकीकडे तुम्ही अस्वस्थ, चिडचिड, गोंधळलेल्या मनःस्थितीत असाल आणि अनिश्चिततेच्या भावनांनी येर-झारा घालत असाल. दुसरीकडे, तुम्हाला अचानक सुट्टीवर जाण्याची इच्छा होईल, तुमच्या उत्साहात तुम्ही योजना बनवाल आणि तुमच्या मित्रांना तुमच्यासोबत बाहेर जाण्यास तयार कराल, परंतु नंतर अचानक शुद्धीवर आल्यासारखे सर्व योजना रद्द कराल, आणि कामावर जाल -  जणू एखाद्या प्रामाणिक कर्मचा-यासारखे!


मिथुन- तुम्ही मूड स्विंग अनुभवत आहात आणि त्याचे कारण तुमच्या अवचेतन मनात खोलवर रुजलेले आहे. थोडा वेळ काढून आत्मपरीक्षण का करू नये? काहीवेळ ध्यान  धारणा केल्यास तुम्हाला शांत वाटू शकते. काही गोष्टी आहेत ज्यावर तुम्हाला तुमचा दृष्टीकोन तपासणे अथवा बदलणे आवश्यक आहे, तुम्ही कार्य करण्यापूर्वी किंवा योजना ठरवण्यापूर्वी तुमच्या मनात सर्व स्पष्ट असणे आवश्यक आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी हा दिवस फारसा उज्ज्वल नाही.


कर्क- तुमचा उदार स्वभाव तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वेदना आणि अस्वस्थतेच्या भावना लपवून दुसऱ्याला बरे वाटेल. तसे करण्यास प्रवृत्त करेल. पण, वेदनांना रेंगाळू देऊ नका. तुम्हाला बाहेर जाऊन तुमच्या स्वतःच्याच कंपनीचा आनंद घ्यावासा वाटेल व तुम्ही तसे कराल ही. तसे, ब्युटी पार्लरमध्ये जाणे अथवा काही ट्रेंडी पोशाख खरेदी करणे हे तुमच्या हृदयाच्या दुखापतीसाठी योग्य औषध असल्याचे सिद्ध होऊ शकते. काही काही वेळा तसे करण्याची परवानगी आहे.


सिंह- आज भाग्य तुमच्यावर खूश आहे  आणि तुमच्यावर धनाचा वर्षाव करणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात आर्थिक नफा आणि सत्तेची अपेक्षा करू शकता. संध्याकाळी तुम्हाला भेटवस्तू खरेदी करून आणि रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊन उत्सव साजरा करावासा वाटेल. तुम्हाला पैशांमध्ये स्वाभाविकच रस आहे आणि आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवणे योग्य आहे जेणेकरून कोणीही तुम्हाला फसवू नये.


कन्या- आज कुणाशी चांगली, दीर्घकालीन मैत्री होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवायचा असेल- तुमच्या भावना त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यांना खास वाटू द्या. याचा अर्थ खर्चात वाढ देखील आहे कारण तुम्ही त्यांना काही खास पध्दतीने आनंदी करण्याचा प्रयत्न कराल.


तूळ- विपुलतेचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. होय, त्यात अन्नाचा समावेश आहे (किंवा कदाचित जंक फूड, ते टाळा) तुम्ही जे खात आहात ते खाणे आणि त्याचा आनंद घेणे हे आज तुमचे मन व्यापणार आहे. तसेच तुमच्या करिअरच्या मार्गात भरपूर पर्याय असतील- तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे हे ठरवण्याचा पर्याय असेल. संध्याकाळपर्यंत धन लाभ आहे. उत्तम जेवणाचा आस्वाद घ्या, हा दिवस तणावमुक्त आहे!


वृश्चिक- समविचारी लोकांच्या सहवासात आनंदाने भरलेला दिवस. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि तुम्हाला आनंद देणार्‍या अनेक क्रियाकलापांमध्ये व्यस्त असाल परंतु लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट अधिक करणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते.


धनु- प्रलंबित कामे आज पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या मालमत्तेची अधिक प्रमाणात काळजी घ्याविशी वाटेल म्हणून तुम्ही जास्त सावध असाल पण, कोणीतरी तुमचे मन जिंकण्याची योजना आखत आहे - तुम्ही ते गमावण्यास तयार आहात का? जसा दिवस येईल तसा उत्सुफूर्तपणे जगा.


मकर- आज तुम्हाला पैशाची किंमत समजली आहे आणि भविष्यासाठी ते वाचवायचे आहेत. तुमचे मित्र याबद्दल तुमच्यावर टीका करू शकतात म्हणून ते अति बचत करू नका. तुम्ही तुमच्या कामात स्वतःला झोकून देण्यास तयार आहात आणि इतरांकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत परंतु तुमच्या अपेक्षांमध्ये व्यावहारिक रहा कारण तुमची निराशा होऊ शकते.


कुंभ- आज एक महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील- कदाचित एखादा व्यवसाय करार, एखादी मुलाखत, विक्रीची योजना किंवा एखाद्याला प्रपोज करणे- काहीही असो, तुम्ही तुमचे सर्वोत्तम दिसले पाहिजे, तुमच्या डोक्यात विचारांचा गोंधळ नको, स्मार्ट व्हा, हुशारीने वागा आणि अर्थातच- तुमचे ध्येय साध्य करा.


मीन- आज कोणीतरी खास तुमच्या मनपटलावर आपली छाप पाडत आहे, सतत दृष्टीसमोर येत आहे. - ते तिथे आहेत आणि तुम्ही त्यांचेवर  प्रेम व्यक्त करण्यासाठी, लक्ष पूर्वक त्यांचे लाड करू इच्छित आहात. तुम्हाला त्यांच्यासाठी पर्वत हलवण्यास देखील प्रेरीत आहात परंतु तसेच करणे आवश्यक नाही फक्त त्यांना तुमचे पूर्ण लक्ष द्या. निश्चितपणे, आपण आपल्या कृतींची जबाबदारी घेण्यास तयार आहात. होकारार्थी मान हलवण्यापूर्वी विचार करा. आज तुमच्याकडे करण्यासारखे दुसरे फारसे काही नाही!


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...