१४ जानेवारी २०२२
आजचे संक्रमण
महिना- पौष, तिथी- द्वादशी 22:21:19 पर्यंत, दिवस- शुक्रवार, संवत- 2078,
नक्षत्र- रोहिणी 20:17:39 पर्यंत, योग: शुभ- 13:33:36, करण- बाव- 08:58:29, बलव- 22:21:19,
सूर्योदय: 07:09:49, सूर्यास्त: 18:17:26, चंद्रोदय: 15:20:00
चंद्र वृषभ राशीत असेल *सूर्य 14:29 वाजता मकर राशीत प्रवेश करतो
आजची ग्रहांची स्थिती आणि कुंडली
सूर्य- धनु, चंद्र- वृषभ, मंगळ- वृश्चिक, बुध - मकर, गुरू - कुंभ, शुक्र- धनु,
शनि- मकर, राहू- वृषभ , केतू-वृश्चिक, हर्षल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- मकर
आज आमच्याकडे सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण आणि त्याचा सर्व राशींवर होणारा परिणाम अधोरेखित करणारा एक विशेष अंदाज आहे.
सुर्याचे मकर राशीतील संक्रमण आपल्या चंद्र राशींला काय फल देईल -
मेष- सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण त्याला इतर तीन ग्रहांच्या सहवासात आणेल - शनि, बुध, प्लूटो - त्यामुळे या संक्रमणादरम्यान उर्जेचा स्फोट होण्याची अपेक्षा करा. तुम्ही करिअर, नाव आणि प्रसिद्धीमध्ये नशीब उजळण्याची अपेक्षा करू शकता जे शेवटी तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल.
वृषभ- सूर्याचा मकर राशीत मोठा प्रवेश तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ‘आंतरराष्ट्रीय संक्रमणा’ मध्ये लाँच करू शकतो. तुम्हाला सुट्टीवर जाण्याची खूप इच्छा असेल आणि परदेशी सहलीची योजना आखाल- पुढे जा, हे शक्य आहे, परंतु लक्षात ठेवा की अशा इच्छांची किंमत तुमच्यावर आर्थिक भार टाकू शकते. थोडी वाईट बाब म्हणजे, तुम्हाला तुमच्या वडिलांसोबतच्या नातेसंबंधात समस्या होऊ शकतात, तुम्हाला त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
मिथुन- या संक्रमणादरम्यान आरोग्याची काळजी घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. भागीदारीतील व्यवसायातही चांगले परिणाम मिळतील.
कर्क- हं…… ! सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यातील प्रणय क्षेत्र हायलाइट करते - चांगले आणि वाईट. शांत राहा, धीर धरा, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या जोडीदारा सोबतचे संबंध तुम्हाला त्रासदायक वाटू शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनात तुमच्या कृतींची जबाबदारी घ्या. (तुमचा व्यवसाय हे तुमचे दुसरे प्रेम असू शकते, बरोबर?!)
सिंह- नोकरीत पदोन्नती, अतिरिक्त जबाबदाऱ्या, अतिरिक्त प्रोत्साहने सर्व काही चांगले दिसते परंतु ते यशापर्यंत नेण्यासाठी तुम्हाला चांगले आरोग्य, मनःशांती आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि ध्यान तुम्हाला या संक्रमणातून मदत करेल.
कन्या- प्रिय कन्या, पैसा मौल्यवान आहे, नवीन गुंतवणुकीत धोका पत्करू नका. हे संक्रमण तुमच्यासाठी नवीन गुंतवणुकीसाठी चांगली वेळ नाही. तुमच्या मुलांना वैद्यकीय सेवेची गरज उदद्भवू शकते म्हणून कृपया त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवा. तुमच्यापैकी काहींसाठी, तुमचे प्रेम जीवन तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल.
तूळ- तूळ राशीसाठी हा काळ फारसा चांगला नाही. तुमच्या आरोग्याची आणि आईच्या आरोग्याचीही काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. लव्ह लाईफ सुद्धा समस्याप्रधान असू शकते. सर्व कार्यात समतोल ठेवा आणि तुम्ही तुमच्या सर्व त्रासातून बाहेर पडाल.
वृश्चिक- या संक्रमणादरम्यान शांत राहा आणि भावंडांशी भांडण किंवा वाद घालू नका. महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्या. तुम्ही व्यवसाय किंवा वैयक्तिक दौर्याची योजना आखू शकता कारण या संक्रमण काळात तुमच्यासाठी प्रवास घडून येण्याची शक्यता दिसत आहे.
धनु- या संक्रमण काळात तुमचे डोळे आणि घसा काही प्रमाणात सांभाळणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी देखील वेळ काढा. वित्त क्षेत्रात तुम्ही भाग्यवान ठरणार आहात!
मकर- संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. तुमच्या वडिलांसोबतच्या नातेसंबंधात, तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि प्रेम आणि आदर यांना प्राधान्य द्या. काही चांगले काम करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये थोडी प्रसिद्धी मिळवण्याची शक्यता आहे.
कुंभ- तुमचा स्वभाव तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अडचणीत आणू शकतो, शांत राहा , संयम बाळगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा अहंकार बाजूला ठेवा. काही व्यावसायिक आव्हाने असतील. तुम्ही मानसिक तणावात राहाल आणि याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी काळजी घ्या
मीन- विद्यार्थ्यांसाठी हा संक्रमण काळ चांगला आहे- मग ते तुम्ही स्वतः असाल, किंवा तुमची मुले असतील जी शिकत असतील- ते शैक्षणिकदृष्ट्या चांगले काम करतील आणि तुमच्या अभिमानाला पात्र ठरतील . कोणावरही विश्वास ठेवू नका, तुमची फसवणूक होऊ शकते.
No comments:
Post a Comment