सिध्द कुंजिका स्तोत्र हे सिध्द असे स्तोत्र आहे. यासाठी वेगळे सिध्द करण्याचि आवश्यकता नाही.
गुरूकडून दीक्षा घेण्याचि आवश्यकता नाही. नवरात्रात संकल्प करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा सांगितली आहे.
अन्यथा देवीची मूर्ती किंवा फोटो घेवून त्याची पूजा करण्याची आवश्यकता नाही.
हे स्तोत्र म्हणण्यासाठी कुठलीही वेळ निर्धारीत केलेली नाही. कोणालाही भोजन अथवा दानधर्म या स्तोत्र उपासनेसाठी करण्याची गरज नाही.
मग या स्तोत्र पठणासाठी काय हवे आहे ? तर -
(१) तुमचे स्वच्छ,सुंदर मन. ज्या मनात कुठलेही वाईट विचार नाहीत. आळस नाही. स्तोत्र मनोभावे म्हणण्याची उत्सुकता आहे, श्रथ्दा आहे.
(२) पवित्र विचार, स्वच्छ मनाप्रमाणे स्वच्छ शरीर, स्तोत्र म्हणण्यासाठी स्वच्छ जागा आणि स्तोत्र म्हणताना तुमचि एकाग्रता एवढीच अपेक्षित आहे.
(३) या कुंजिकास्तोत्र पठणाने, दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे सार्थक होते. दुर्गा सप्तशती पाठानुसार. हा पाठ शुभफलदायी होतो. सिध्द कुंजिकास्तोत्र नावातंच सिध्द असलेले हे स्तोत्र, भगवान शंकर, देवी पार्वतींना सांगत आहेत की हे एक गोपनीय स्तोत्र आहे. देवांनाही दुर्लभ आहे. दुसऱ्या कोणत्याही पाठाचि आवश्यकता नाही.
(४) यातिल नवार्ण मंत्र हा यशसिध्दी,अभय देणारा आहे.
‘ऐं ह्रिं क्लीं चामुंडायै वीच्चे’
हा नवार्ण मंत्र आहे. ‘ऐं’ हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे.
‘ह्रीं’ हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. तर ‘क्लीं’ हा बीज मंत्र कालीमातेचा आहे. ‘चामुंडायै’ दुर्गा मॉं चा आहे.
(५) हा चण्डीपाठ आहे. हा पाठ करताना ज्या कृपेचि तुम्हाला अपेक्षा आहे, मग ते कारण धनप्राप्ती असो किंवा रोग मुक्ती असो, शत्रूवर विजय हवा असेल, कर्जफेड करण्याची इच्छा याप्रमाणे किती पाठ करावे ते पुढे दिले आहे.
मनोभावे स्तोत्र पाठ करा. माता दुर्गा, माता लक्ष्मी,माता सरस्वती व कालीमाता सर्वांची कृपा तुमच्यावर होवो.
हे सिध्द कुंजिकास्तोत्र तुम्हाला यशदायक, शुभफलदायी होवो ही प्रार्थना करत माझा लेख पूर्ण करते.
*सिद्ध कुंजिका स्तोत्र * व माहिती.
"सिद्ध कुंजिका" ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी आणि प्रखर स्तोत्र आहे. असे मानले जाते कि जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील, तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचेही फळ मिळते . आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दु:ख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. परंतु या नवरात्रातल्या स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
*सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीच्या पाठ करण्याची पद्धत*
- कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात पठण करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते.
- साधकाने सकाळी स्नानविधी करून, मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तूपचा दिवा लावा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद लावा.
- यानंतर अक्षता,पुष्प, एक रुपयाचा नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रातील नऊ दिवस संयम-नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करा. नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा. हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा.
- यानंतर, दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा
*धनलाभासाठी: ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते. सतत आर्थिक नुकसान होत आहे. अनावश्यकपणे पैसे खर्च करणार्याना कुंजिका स्तोत्रांच्या वाचनाचा फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशाचा संग्रह वाढतो. *शत्रुमुक्ती- हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. *कोर्ट कचेरी, खटले जिंकले जाऊ शकतात. *रोग मुक्तता: दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्रांच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता. *कर्जमुक्ती: जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावयास लागत असल्यास, कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण त्याने केल्यास कर्ज मुक्ती लवकरच होईल. *सुखद वैवाहिक जीवन- विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते.
- दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे.
- नवरात्रीसाधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका. यामुळे उलटे फळंही मिळू शकते.
- कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा,एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो.
- संकल्प केल्यास या वेळी मांस किंवा मद्यपान करू नका. सेक्सबद्दलही विचार आणू नका.
- श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे, ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्रीदुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता.नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे.