आजचे पंचांग - 19 जानेवारी 2022

 19 जानेवारी 2022

आजचे संक्रमण

महिना- पौष, कृष्ण तिथी- द्वितीया अहोरात्र (पूर्ण रात्र), दिवस- बुधवार, संवत- 2078,

नक्षत्र- आश्लेषा अहोरात्रापर्यंत, योग: प्रिती- १६:०३:५७, करण- तैतील- १९:३५:०२,

सूर्योदय: 07:10:05, सूर्यास्त: 18:20:36, चंद्रोदय: 19:36:00,

 *चंद्र कर्क राशीत असेल

आजची ग्रहांची स्थिती आणि कुंडली


सूर्य- मकर, चंद्र- कर्क, मंगळ- वृश्चिक, बुध - मकर, गुरू - कुंभ, शुक्र- धनु,


शनि- मकर, राहू- वृषभ, केतू- वृश्चिक,  हर्षल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- मकर 

आजचा दिवस कसा असेल

मेष- दीर्घ आजारातून बरे झाल्याबद्दल आज तुम्ही  कृतज्ञता व्यक्त करू शकता. यासाठी दानधर्म करणे, गरजूंना मदत करणे, देणगी देणे हा सोपा मार्ग आहे. यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि लोक तुमचा उदारतेसाठी आदर करतील. तुम्ही कुटुंबातील किंवा कामाच्या ठिकाणी तरुण सदस्यांना  वेळेचे व्यवस्थापनाबाबत सल्ला देऊ शकता. तुमच्या आईशी तुमचे नाते चांगले राहील, भाऊही साथ देईल, जोडीदार चांगल्या मूडमध्ये असेल. त्यामुळे एकूणच तुम्ही आनंदाच्या आणि शांतीपूर्ण दिवसाची व्यतीत करणार आहात..

वृषभ- तुम्ही आज उर्जेने भारलेले असाल व कामाच्या ठिकाणी  तुमचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन आणि समस्यांचे त्वरित निराकरण करणे लोकांना प्रभावित करेल. नवीन यशामुळे तुमच्या टोपीमध्ये आणखी एक मोरपिस खोचले जाणार आहे.. लोक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे पाहतील. तुम्हीही त्यांच्यासाठी आदर्श होऊ शकता. तुमच्या यशाने कुटुंबातील सदस्य खूश होतील. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल, परंतु आनंदाच्या मूडमध्ये तुमचे कष्टाचे पैसे वाया घालवू नका, ते आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी वाचवा.

मिथुन- आज तुम्हाला कामावर आणि घरामध्ये मागणी आहे. कामाचा ढीग आहे, पण तुम्ही इतके उर्जेने भरलेले असाल, आवश्यकतेच्या अर्ध्या वेळेत सर्व काम पूर्ण कराल. म्हणून, थोडा वेळ काढा आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजा भागवण्यासाठी खर्च करा. काही चेष्टा-विनोद करून तुमच्या जोडीदाराचा उत्साह/आनंद  वाढविण्यास मदत करा. तुमची स्वतःची आर्थिक परिस्थिती सरासरी आहे पण तुमची मुले काही आर्थिक बक्षिसे मिळवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आज वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढे ढकला.

कर्क- तुमच्या जीवनात कोणतीही आव्हाने असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कुरकुर करून कोणीही विजेता होत नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतही सावध राहण्याची गरज आहे. व्यवसायात असलेल्यांसाठी, तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि नवीन लोकांना भेटण्यासाठी चांगला दिवस आहे जे तुमच्या व्यवसायाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा लोकांच्या गाठी-भेटी घ्या. एखाद्या कॉन्फरन्समध्ये किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रदर्शनासाठी जा. तुम्ही पार्टीही देऊ शकता आणि काही जुन्या मित्रांनाही आमंत्रित करू शकता.

सिंह- तुमच्यासाठी काही सल्ले आहेत- तुमच्या उत्तम वर्तनावर राहा. इतरांशी कठोरपणे वागू नका, उद्धटपणे वागू नका. आज नेमके तुम्ही ज्या गोष्टी करू नयेत त्याच गोष्टी करण्याच्या अशा अनेक शक्यता आहेत. तुमच्या वाईट वागणुकीमुळे तुम्ही अनेकांना दुखवू शकता त्यामुळे नियंत्रण ठेवा. तुमच्या सहकार्‍यांशी, तुमच्या जोडीदाराशी किंवा लहान भावंडांशी भांडण करू नका कारण ते वाईट बोलू शकतात किंवा एखाद्या प्रकारे तुमचे नुकसान करू शकतात. तुमचे आरोग्य बरे असेल. आर्थिक स्थिती देखील चांगली आहे कारण तुम्हाला काही मध्यम स्वरूपाचे लाभ होऊ शकतात. तुमच्या गुंतवणुकी बाबत सावध व स्मार्ट रहा. तुम्हाला चिडवणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

कन्या- कौटुंबिक बाबी आज आघाडीवर आहेत कारण कौटुंबिक समस्या तुमचा वेळ घेतात, नोकरांकडून समस्यांची अपेक्षा करा. लांबचे प्रवास आणि नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या योजना रद्द केल्या जाऊ शकतात, आजचा दिवस दोन्हीसाठी ठीक नाही. कामातही तुमचे सहकारी तुमचा वेळ घेतील. व्यापारी सरासरी व्यवसाय करतील. नेत्रदीपक काहीही नाही. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल सांगण्यासारखे काही नाही- घरी राहणे आणि आराम करणे चांगले!

तूळ- प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा आजचा दिवस आहे- मग ते घरातील असो किंवा कार्यालयात. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याची गरज आहे. तुम्हाला एक गोष्ट नक्कीच करायची आहे - तुमचे पैसे पर्समध्ये ठेवा आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्स व्यवस्थित झिप करा. तुमच्या करिअरला चालना देण्यासाठी काही महत्त्वाच्या व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतात. दिवसाच्या शेवटी तुमची काळजी हळूहळू नाहीशी होईल कारण तुमचा जोडीदार तुमच्या मूडची काळजी घेईल.

वृश्चिक- आनंदाने भरलेल्या दिवस - प्रेम, प्रणय, पैसा आणि यश- तुम्हाला आणखी काय हवे आहे? लग्नाचे प्रस्ताव? होय, ते देखील असतील! नकारात्मक बाजू- दिवस चांगला जाण्यासाठी तुम्ही वाईट संगतीपासून दूर राहिल्यास हे सर्व शक्य आहे, पैसे वाचवा कारण वाचवलेला पैसा हा कमावलेला पैसा आहे. प्रवास करत असाल तर स्वतःची आणि सामानाची काळजी घ्या.

धनु- आज तुमच्या गरजांना प्राधान्य द्या आणि त्यानुसार खर्च करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि आपल्या आव्हानांना तोंड द्या. काहीही कायमचे टिकत नाही आणि असे काहीही नाही जे तुम्ही दृढनिश्चयाने मात करू शकत नाही. तुमचे मित्र आणि तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी आहेत. तडजोड करू नका, आवश्यक असेल तेव्हा बोला, कठोर शब्द वापरू नका- शांत आणि सभ्य रहा. धर्मादाय कार्य, इतरांना मदत केल्याने तुम्हाला शांती मिळण्यास मदत होईल.

मकर- तुमचे काम र्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. महत्त्वाच्या व्यक्ती तुमची कारकीर्द सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात - त्यांच्या संपर्कात राहा. तुमच्या कामात तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देईल.अध्ययनासाठी चांगली वेळ आहे तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करा. व्यावसायिकांसाठीही चांगली वेळ आहे नविन भागीदारी करण्यासाठी. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, कारण चोरी होण्याची शक्यता आहे.

कुंभ- तुमच्या आरोग्याची, विशेषत: हृदयाची काळजी घ्या. दबाव आणू नका आणि धूम्रपान किंवा इतर कोणत्याही वाईट सवयीत अडकू नका. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत आणि कोणत्याही नवीन डीलमध्ये जाण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगल्यास तुम्ही आर्थिक नुकसान टाळण्यास सक्षम असाल. नव्हे,  तुम्ही सावध राहिल्यास, काही नफा देखील होऊ शकतो. तुमची कौशल्ये आणि चटकन विचार करून निर्णय अथवा कृती करण्यामुळे तुम्ही काही प्रशंसा मिळवू शकाल. अभ्यासासाठी दिवस चांगला आहे.

मीन- आज तुम्हाला तुमच्या काही गुंतवणुकीतून थोडा नफा मिळेल. तसेच परदेशातील मित्र किंवा कुटुंबाशी संवाद साधल्याने काही फायदे होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मित्रांनाही भेटायला आवडेल - एकतर त्यांना आमंत्रित करा किंवा त्यांना भेट द्या. तुम्ही फेरफटका मारू शकता आणि आराम करण्यासाठी एकटे राहू शकता. एक शांत, शीतल दिवस.


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...