आजचे पंचांग - 16 जानेवारी 2022

 १६ जानेवारी २०२२

आजचे संक्रमण


महिना- पौष, तिथी- चतुर्दशी 27:20:37 पर्यंत, दिवस- रविवार, संवत- 2078,


नक्षत्र- अर्द्रा 26:09:22 पर्यंत, योग: इंद्र- 15:18:14,  करण- गर- 14:12:26, ​​वाणीज- 27:20:37,


सूर्योदय: 07:10:00, सूर्यास्त: 18:18:42, चंद्रोदय: 16:55:00,   * चंद्र मिथुन राशीत असेल


आजची ग्रहांची स्थिती आणि कुंडली


सूर्य- मकर, चंद्र- मिथुन, मंगळ- वृश्चिक, बुध - मकर, गुरू - कुंभ, शुक्र- धनु,


शनि- मकर, राहू- वृषभ, केतू-वृश्चिक, हर्षल- मेष, नेपच्यून- कुंभ, प्लूटो- मकर.



आजचा दिवस कसा असेल 


मेष- तुमच्या उर्जेला आणि उत्साहाला सीमा नाही, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की तुम्ही हाताळू शकता त्यापेक्षा अधिक कामे हाती घेणे, तुम्हाला केवळ गोंधळात टाकणार नाही तर चुका, वाईट निर्णय होऊ शकतात. तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका, एकावेळी एकच काम करण्याची योजना करा. तुम्हाला इतर लोकांचा पाठिंबा मिळेल- जोडीदार, सहकारी, व्यवसाय भागीदार समस्या सोडवण्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी मदत करतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीला उपस्थित राहिल्यास, अशा प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी मिळेल ज्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकेल. महत्त्वाची चर्चा करून उज्वल भविष्यासाठी आजच काही निर्णय घेतल्यास ते योग्य ठरेल. तुमच्या जोडीदारावर शंका घेऊ नका, उलट हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काही छान क्षण व्यतीत करू शकता.


वृषभ- तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ध्यान-धारणा किंवा फक्त काही वेळ स्वतःसाठी घालवणे, एखादा छंद पाळणे किंवा फिरायला जाणे यामुळे तुमचा गोंधळ दूर होण्यास मदत होऊ शकते- कारण आज तेच होणार आहे, तुमचे सर्व निर्णय आणि गणिते चुकण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना अयशस्वी होतील आणि तुम्हाला निराश वाटेल. शक्य असल्यास, तुमची मनस्थिती सुधारे पर्यंत तुमच्या महत्त्वाच्या योजना, प्रकल्प किंवा निर्णय दूर ठेवा. प्रवास व्यस्त असू शकतो. वैयक्तिक नातेसंबंधात, तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी असेल आणि तुमची मुले तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळवून देतील.


मिथुन- व्यस्त दिवसातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला तुमची ऊर्जा आणि वेळेचा सर्वोत्तम वापर करून मार्ग शोधावे लागतील. पैशाच्या प्रकरणांबद्दलचा कोणताही खटला अनुकूलपणे संपेल. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत असताना, कुटुंबातील सदस्याचे ऐकण्यासाठी आणि भावनिक विषयांवर सल्ला देण्यासाठी थोडा वेळ काढा. एखादा अनपेक्षित अतिथी आज तुमचा वेळ घेऊ शकतो.


कर्क- तुमच्या आरोग्या विषयी चिंता करण्याचे काही कारण उत्पन्न होउ शकते आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कोमगिरी करण्यापासून रोखू शकते. आज, तुम्ही व्यवसायाशी निगडीत एक चांगला व्यवहार पार पाडू शकाल आणि काही नफा मिळवू शकाल. तुमच्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवणे, त्यांना आनंद देण्यासाठी एखादी खास डिश बनवणे आणि अनपेक्षित चांगली बातमी मिळणे  या सर्वाचा एकूण अर्थ- म्हणजे प्रियजनांसोबतचे आनंदाचे क्षण! आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय खाता ईकडे लक्ष असू द्या एव्हढी सावधगिरीची नोंद घ्या.


सिंह- तुम्ही नैसर्गिकरित्या एक नेता आहात. तुम्ही इतरांनी तुम्हाला मार्ग दाखवण्याची वाट पाहत नाही, तर स्वतःचे मार्ग, स्वतःच आखता. साहजिकच, आत्मविश्वास, जोखीम घेणे, धोरणात्मक विचार आणि दूरदृष्टीची स्पष्टता हे गुण आहेत ज्यावर तुम्ही अवलंबून आहात आणि आज तुम्ही ते पुरेपूर उपयोगात आणणार आहात. तुमच्या मार्गात येणारे कोणतेही अडथळे असोत, तुम्ही ते दूर कराल- मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा ऑफिस बोर्ड रूम. आज चांगले पैसे कमावण्याच्या संधी मिळतील, परंतु स्वार्थी हेतूने नव्हे तर कौटुंबिक कल्याणाच्या विचारांनी कार्य करा. मित्र तुमची मदत घेऊ ईच्छित असतील व तुम्ही त्यांना नक्कीच मदत कराल. आज जोडीदार तुमच्याकडे खास लक्ष देणार आहे. तुम्हीही ‘रीटर्न गिफ्ट’ द्या!


कन्या- जुनी कामे करण्यासाठी काहीवेळा नवीन पद्धती लागू कराव्या लागतात, कारण जुन्या पद्धती ठराविक कालावधी नंतर उपयोगी पडत नाहीत. आपले अडलेले काम पूर्ण करण्यासाठी तुमची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वापरा. आज आरोग्य चांगले राहील. तुम्ही दिवसाच्या ब-याचशा काळात व्यस्त असाल परंतु मित्रांना भेटण्यासाठी थोडा वेळ द्या. जोडीदार  पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडणार आहे. अर्थात, बाकी दिवसही चांगलाच जाणार आहे. 


तूळ- आज तुम्ही ‘मिडास टच’चा आनंद घ्याल. ज्या वस्तूला मिडास राजा हात लावायचा ती सोन्याची व्हायची त्या गोष्टी प्रमाणेच, जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. कायदेशीर बाबी तुमच्यासाठी अनुकूल ठरतील. मालमत्तेच्या बाबतीत फायदा होईल. तुमच्या मुलांसोबत थोडा वेळ घालवा, ते तुम्हाला आनंदित करतील आणि तुमचे मानसिक किंवा भावनिक त्रास कमी करतील. तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देत असला तरी कदाचित थोडे विचित्र वागून तुम्हाला त्रास देऊ शकतात. आराम करण्यासाठी थोडा वेळ स्वतः सोबत घालवा. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे.


वृश्चिक- व्यस्त वेळापत्रक, कार्यालयातील कामाचा ताण आणि घरातील समस्या तणावपूर्ण ठरतील आणि तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतील. परंतु सर्व काही वाईट नाही, जर तुमच्याकडे परदेशात जमीन असेल आणि ती विकण्याचा विचार करत असाल तर त्यातून चांगले पैसे मिळतील, तुमच्यापैकी काहीजणांना कदाचित लग्नाचा प्रस्ताव येईल, आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकां बरोबर एकत्रित पणे काम करून, सुखः-दुखांची देवाण- घेवाण करून  नातेसंबंध दृढ करता येतील, तुम्हाला कदाचित तुमच्या दूरवर असलेल्या मित्रांशी बोलण्याची इच्छा असेल तर तसे जरूर करा.


धनु- आरोग्याची काळजी घेण्यासाठी दुर्गुणांपासून दूर राहा, कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा, भविष्यासाठी योजना करा, आवश्यक असल्यास पालक आर्थिक मदत करतील, प्रवास फायदेशीर असेल, परंतु खर्चिक असू शकते. तुमच्यापैकी जे आज कुणी, कुणाला मागणी घलण्याच्या विचार करत असतील त्यांनी जरूर पुढे जावे. आपल्या खास व्यक्ति सोबत चांदण्यांत  फिरायला जावे.


मकर- आज तुमच्या आयुष्यात फार काही घडत नाहीये..पण लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे..ते भविष्यात घडू शकते आणि आज तुम्ही त्या मनोरंजक, उज्वल भविष्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी वेळ काढू शकता. नविन कपडे, हेअरस्टाईल  व इतर प्रकारे स्वतःची काळजी घेण्यात वेळ घालवा. कामाच्या ठिकाणी, समस्या त्वरीत सोडवण्याच्या क्षमतेने तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना प्रभावित कराल. एखाद्या कार्यक्रमात भेटलाली कुणी प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला महान गोष्टी करण्यासाठी प्रेरित करण्याची शक्यता आहे.


कुंभ- तुम्ही तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने आज खूप लोकाचे लक्ष वेधून घेणार आहात. तुम्हाला हवे ते करायला तुम्ही लोकांना तयार करू शकता. पण तिच खरी समस्या आहे. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे माहित असणे आवश्यक आहे! सारासार विचार करा, आवश्यक असल्यास आपले विचार कागदावर लिहून काढा आणि नंतर आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आपले संवाद कौशल्य वापरा. त्याच वेळी, सुरळीत भविष्यासाठी काळजी घ्यायचे लक्षात असू द्या, हाच नियम तुमच्या नातेसंबंधांना लागू होतो. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे कळू द्या. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही! 


मीन- कलाकार अथवा विविध कला क्षेत्रातील व्यावसायिक- यशस्वी होण्याची, त्यांच्या कामासाठी पुरस्कार आणि प्रशंसा मिळण्याची आज अपेक्षा करू शकतात. काहींसाठी, आर्थिक स्थिती चिंतेचे कारण असू शकते. तुमचे कुटुंब तुम्हाला आनंदित राहण्यास मदत करेल, मुलां बरोबर घलवलेला वेळ आनंद आणि आराम देईल व कामाचा ताण कमी होईल. हा दिवस तुमच्या जोडीदारासोबत चांगला काळ दर्शवतो, तुम्ही त्यांच्यासोबत खरेदीला जाऊ शकता, कदाचित रात्री बाहेर जेवायला जाल . संध्याकाळ रोमँटिक नोटवर संपण्याचे चिन्ह स्पष्ट आहे!

No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...