दिनांक 28 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रात, जनमानसात एकच चर्चा चालू आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू ही अत्यंत दुःखदायक बातमी आल्यापासून जनमानस ढवळून निघालेले आहे. खरोखरच कुठल्याही पदावर असलेली व्यक्ती सुरक्षित नाही का? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला सतावत आहे. अवघ्या 35 ते 40 मिनिटाचा प्रवास आणि होत्याचं नव्हतं झालं का? वेगवेगळे तर्क केले जात आहेत. मुळात विमानात पाच प्रवासी होते की सहा प्रवासी होते, ही चर्चा वेगवेगळ्या सोशल मीडियावर चालू आहे कारण पाच शव मिळालेली आहेत, मग सहावी व्यक्ती कुठे गेली? एका यूट्यूब चैनल वर तर वैमानिकाच्या पत्नीने तिचा पायलट पती जिवंत आहे असे म्हटले आहे. या जोडीला मुळात दोन ते तीन पायलट बदलले गेले अशीही चर्चा आहे, त्यामुळे याबाबत संभ्रम अवस्था आहे. काहींचे म्हणणे असे की अजित दादा पवार हे विमानात चढलेच नाहीत किंवा काही म्हणतात त्यांनी विमानातून ऐनवेळी उडी घेतली. आता यावर चौकशी व शोधा शोध सर्व विविध स्तरावर चालू आहे.
मी एक ज्योतिषी, मला ही 28 तारखेपासून चैन पडत नव्हते. ही सर्व चर्चा ऐकून मला अजित दादांची पत्रिका पुन्हा एकदा अभ्यासण्याचा मोह झाला.
या आधी फेसबुक वर अजित दादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिका संदर्भात पोस्ट दिल्या आहेत. या दोघांच्या पत्रिकेतले साम्य आणि वेगळेपण याची तुलना करत गेली काही वर्षे मी ज्योतिषीय अंदाज मांडले आहेत. नकळतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे बद्दल मन धास्तावले, पण मनाला गप्प करून मी हा निर्णय घेतला की अजितदादांची पत्रिका परत बघायची. ज्योतिष शास्त्रात एक असा अलिखित नियम आहे की मृत व्यक्तीची पत्रिका बघू नये पण इथे प्रश्न हाच आहे की व्यक्ती मृत आहे का हे पत्रिकेवरून बघायचे आहे. तसेच मृत्यू झालाच असेल तर तो अपघात होता की घातपात? हे प्रश्न अजित दादांची पत्रिका पाहिल्या शिवाय उलगडणार नाहीत म्हणून मी त्यांची पत्रिका पाहण्याच्या निर्णयाला पोहोचले. राजकारणी व्यक्तींच्या पत्रिकांमध्ये नेहमीच एक घोळ असतो बऱ्याचदा, बऱ्याच जणांची जन्मवेळ दिलेली नसते. जन्मतारीख व जन्म ठिकाण दिलेले असते आणि दुपारी बाराची वेळ निश्चित धरून पत्रिका बनवलेली असते. आता या ठिकाणी मला दादांची अजून एक पत्रिका मिळालेली आहे. त्यात जन्मवेळ दुपारी एक वाजून 42 मिनिटे ही दिली आहे. अर्थात ही वेळ नक्की आहे किंवा नाही याची खात्री नाही. तरी या दोन्ही वेळां प्रमाणे दोन पत्रिका अभ्यासून मी एका गोष्टीवर निश्चित होत आहे की दोन्ही पैकी कुठलीही पत्रिका अपघात जन्य परिस्थिती दाखवतच नाही म्हणजेच दादांचा मृत्यू झालाच असेल तर तो अपघातात झालेला नाही. याचाच दुसरा अर्थ विमान अपघात हा घातपात असू शकतो. आता दुसरी गोष्ट, जेव्हा दुसरा प्रश्न मांडला की पत्रिका दादांचा मृत्यू दाखवत आहे का? तर या दोन्ही पैकी कुठल्याही पत्रिके मध्ये दादांचा अपघातात सापडून मृत्यू झाला असे निदर्शनास येत नाही. दोन्ही पत्रिका प्रमाणे दादांना दीर्घ आयुष्य आहे असे दिसते. दोन्ही पत्रिकांमध्ये सिंह राशीत शुक्र आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे पत्रिकेच्या बाराही स्थानांपैकी कुठल्याही स्थानी सिंह राशीत शुक्र असेल तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य ( ८५+) असते. अनुभवांच्या आधारे हा सिद्धांत मांडला गेला आहे. महत्वाची गोष्ट अशी की सिंह राशीत शुक्र, मंगळ व प्लुटो हे तीन ग्रह राजकीय व्यक्तिमत्व, राजकारणातील संघर्ष मय जीवन, सत्ता, राजकीय जीवनातून पैसा व कीर्ती या सर्व बाबी दाखवतात व ही प्रत्येक गोष्ट दादांच्या जीवनात पहावयास मिळाली आहे याचाच अर्थ, जेव्हा सिंह राशीत शुक्र असेल तर त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते हा सिद्धांत ही दादांच्या पत्रिकेत तितकाच लागू होतो आणि म्हणून मी या निष्कर्षाला पोहोचले आहे की दादांचा मृत्यू झालेलाच नाही. दादा अपघातात सापडून त्यातून वाचले असण्याची शक्यता आहे किंवा अपघातात सापडलेच नाहीत म्हणजेच ते विमानात चढलेच नाहीत ही शक्यताही नाकारता येत नाही. मग नेमके काय झाले असावे? तर 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती! '
दादांची दुपारी एक 42 ही जन्म वेळ असलेली पत्रिका ग्रहांच्या गोचर स्थिती मुळे मृत्यूचे गंडांतर आल्याची परिस्थिती दर्शवते पण दादा यातून वाचले आहेत स्पष्ट होते आहे. आता शोध घेणाऱ्यांनी दादा कुठे असतील हे शोधावे. पत्रिकेचे निदान मी माझ्या अभ्यासाप्रमाणे केले आहे आणि त्याला मी, म्हणजे माझ्या स्वध्यायनाला मी 55 ते 60% मार्क देते आहे.
नोंद घेण्याची बाब म्हणजे हा मी केलेला दादांच्या पत्रिकेचा अभ्यास आहे व हे माझे मत ही मांडले आहे. माझ्या या विश्लेषणाचा उपयोग दादांचा शोध घेण्याकरता केला जावा.
- रेखा छत्रे रहाळकर
.jpg)